अहमदनगर निवडणूक निरीक्षक ताई. के.व जिर्हाधिकारी सिध्दराम सालिमठ यांनी केली निवडणूक कामाची पाहणी
केडगाव : अहमदनगर शहर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठीअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील निवडणूक कार्यालयास केंद्रीय निवडणूक निरीक्षक ताई. के.यांनी आज भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील व सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय शिंदे यांनी कामकाजाविषयी माहिती दिली. केंद्रीय निरीक्षक यांनी निवडणुकीचे नोंदणी कार्यालय, स्ट्रॉंग रूम, एम.सी.सी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, सी.सी.टी.व्ही, आचारसंहिता कक्ष आदींची याची पाहणी करून कामकाजाविषयी सूचना केल्या. कंट्रोल रूमची पाहणी करून आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले.
स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेतेबाबत पोलीस पथकास सूचना दिल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे ,नायब तहसीलदार सुधीर उबाळे, अभिजित वांढेकर, अनिल तोरडमल तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . अहिल्यानगर शहरातील एस. एस. टी. पथकांना केंद्रीय निवडणूक निरीक्षक ताई. के. भेट दिली
यावेळी बोलताना ताई.के. म्हणाले की, सर्व यंत्रणांनी सतर्कतेने काम करणे गरजेचे आहे. विशेषतः प्रचार सभा, मिरवणुका व कार्यक्रमांवर केल्या जाणाऱ्या खर्चावर निगराणीसाठी असलेल्या पथकांनी अत्यंत बारकाईने नोंदी घेताना व्हिडिओ शुटींग करावी. कुठल्याही पथकाच्या माध्यमातून अथवा चेकपोस्टवर कारवाई करताना, तपासणी तसेच कारवाई करताना निवडणूक आयोगाच्या अपेक्षेप्रमाणे फलनिष्पत्तीवर भर देण्यात यावा. निवडणूकीच्या निमित्ताने होणाऱ्या प्रत्येक अर्थविषयक बाबींवर अत्यंत सुक्ष्मपणे लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे सांगून भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वाहनांची तपासणी अधिक दक्षतापूर्वक करावी. पथकांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे प्रभावीपणे काम करावे. भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवून सहाय्यक खर्च निरीक्षकांच्या संपर्कात राहावे. मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोकड, मद्य तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा. कारवाईमध्ये सातत्य ठेवावे. कामकाजाचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक निरीक्षक ताई. के.(भा.प्र.से.)व जिर्हाधिकारी सिध्दराम सालिमठ यांनी अहमदनगर शहर विधानसभा निवडणूक कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
फोटो : अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कामकाजाची पाहणी निवडणूक आयोगाचे निरीक्षक ताई के . यांनी केली . यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी त्यांचे स्वागत केले