राहुल जगताप यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

राहुल जगताप यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल..*

*अथांग जनसमुदायाने दाखवून दिली परिवर्तनाची लाट..*

देविदास गोरे , पत्रकार , रुईछत्तिशी…

“नगर – श्रीगोंदा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.अथांग जनसमुदाय मतदारसंघात परिवर्तनाची लाट करणार याची प्रचिती येऊ लागली आहे.नगर – श्रीगोंदा मतदारसंघात सांगली पॅटर्न होणार का ! याची चर्चा मतदारांत रंगली आहे.नगर – श्रीगोंदा मतदारसंघातून ठाकरे सेनेकडून अनुराधा नागवडे , भाजप कडून प्रतिभा पाचपुते , वंचित बहुजन आघाडी कडून अण्णासाहेब शेलार , घनश्याम शेलार अपक्ष , सुवर्णा पाचपुते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.उमेदवारीतून आता कोण माघारी घेणार की सगळेच रिंगणात उतरणार हेही पाहणे महत्वाचे असणार आहे पण राहुल जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेले शक्ती प्रदर्शन आज संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. मतदारांची उत्स्फूर्त साथ आणि उत्सुकता बदल घडवून आणणार का की अपक्ष उमेदवार कोणाच्या पथ्यावर पडणार हेही पाहणे औत्सुक्याचे आहे.२०१४ साली राहुल जगताप राज्यात सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आले होते. मोदी लाटेत त्यांनी बबनराव पाचपुते यांचा पराभव केला होता आता देखील राहुल जगताप यांच्या समोर प्रतिभा पाचपुते आणि अनुराधा नागवडे यांचे आव्हान असले तरी त्यांचे आव्हान जगताप पूर्णपणे खोडून काढणार हे त्यांच्या भाषणा वरून समजते.राहुल जगताप हे निवडणुकीत रंगत आणतील यात शंका नाही पण कोण होईल नगर – श्रीगोंद्याचा आमदार ! हे आता जनताच दाखवून देईल.नगर – श्रीगोंदा मतदारसंघात आतापर्यंत इतक्या हाय होल्टेज लढती पहायला मिळाल्या नाहीत तितक्या लढती रंगणार आहेत. महाविकास आघाडीत फूट पडल्याने याचा फायदा भाजपला होऊ शकतो का हेही तितकेच खरे आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *