वाकोडी येथील मैला शुद्धीकरण केंद्राची आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी…*

 वाकोडी येथील मैला शुद्धीकरण केंद्राची आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी…*

रुईछत्तिशी – अमृत भुयारी गटार योजनेतंर्गत अहमदनगर महानगरपालिकेकडून वाकोडी येथे उभारण्यात येत असलेल्या मैला शुद्धीकरण केंद्राची आज पाहणी केली. हे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच पूर्ण होईल
सांडपाणी व्यवस्था ही नगर शहराची मागील अनेक वर्षांपासूनची समस्या होती. स्वतंत्र प्रकल्प नसल्याने सांडपाणी सर्रासपणे सीना नदीत सोडले जाते व यामुळे नदी प्रदूषित होत‌ आहे.‌ शहरातून वाहणारी  सीना नदी अहमदनगरकरांची ओळख आहे, मात्र शहराचे सांडपाणी नदीमध्ये सोडले जात असल्याने नदीत दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सावेडी, सारसनगर, कल्याण रोड, केडगाव या विस्तारत असलेल्या परिसरात तर शोषखड्डे हाच एकमेव पर्याय सांडपाण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे संपूर्ण शहरात भुयारी गटारीचे जाळे निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या अमृत योजनेच्या माध्यमातून बहुतांश काम पूर्ण झाले आहे. वाकोडी येथे मनपाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या मैला शुद्धीकरण केंद्राच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील सांडपाणी थेट वाकोडी येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जाणार असून ते पाणी शुद्ध होऊन सीना नदीमध्ये सोडले जाणार आहे. सीना नदीच्या कडेला असलेल्या वाहिनीला भूमिगत गटारीच्या वाहिनीची जोड देण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सीना नदीत विना प्रक्रिया सांडपाणी सोडले जाणार नाही.  त्यामुळे डासांची उत्पत्ती, दुर्गंधी पासून सर्वांची सुटका होईल. त्याचा थेट परिणाम आरोग्यमान सुधारण्यावर होणार आहे. याशिवाय जलस्रोतही प्रदूषण मुक्त होण्यास मदत होणार आहे.
यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता मनोज पारखे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, उद्योजक राजेश भंडारी, वैभव वाघ, संतोष लांडे, जॉय लोखंडे, निलेश हिंगे, राजेश जैन आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *