बारागाव नांदूरसह राहुरीकर संतापले; शिवाजीराव गाडेंना सर्वाधिक वेदना तुम्ही दिल्या, त्यांच्या निधनानंतर तुम्ही हसत
होता !
शेतकऱ्यांच्या हिताआड येणाऱ्या तनपुरेंचा हिशोब चुकता करणार- गाडे
धनंजय गाडे यांच्यासह शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला निर्धार। शेतकरी मंडळ शिवाजीराव कर्डिलेंच्यापाठीशी
राहुरी / प्रतिनिधी
राहुरी तालुक्याचे नेते स्वर्गीय शिवाजीराव गाडे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचे पाप तुम्ही केले. शिवाजीराव गाडेंना जिवंतपणी आणि मृत्यूपश्चात सर्वाधिक वेदना तुम्हीच दिल्या, त्यांच्या निधनानंतर तुम्हीच हसत होता हे आम्ही विसरलो नाहीत अशी संतापाची भावना बारागाव नांदूर व राहुरी तालुक्यातील शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. प्रसाद तनपुरे आणि प्राजक्त तनपुरे यांच्याकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा पाढा यावेळी वाचण्यात आला. शिवाजीवार गाडे यांचा फोटो लावण्यासाठी आम्हाला तुमच्या पाया पडावे लागले असा आरोपही यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हिताआड येणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांचा हिशोब चुकता करणार आणि त्यांना त्यांची जागा दाखवणार असा निर्धार यावेळी मंडळाचे अध्यक्ष धनराज गाडे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. शिवाजीराव गाडे यांचे शेतकरी मंडळ आपल्यासोबत असल्याचा दावा प्राजक्त तनपुरे यांनी केल्यानंतर या मंडळाचे अध्यक्ष धनंजय गाडे यांनी तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्राजक्त तनपुरे यांचा राजकीय जन्मच शिवाजीराव गाडे यांच्या निधनानंतर झाला. आता त्याच तनपुरे यांच्यावर गाडे यांच्या कुटुंबाने तोफ डागली असल्याचे समोर आले आहे.
शिवाजीराजे यांचे अकाली निधन झाल्यानंतर परिवार डाव्यावर कोण-कोण हसत होते हे सांगण्याची वेळ आणू नका! आमचे शिवाजीराजे जिवंत असते तर तुमचा राजकीय जन्म देखील झाला नसता असा टोला प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख टाळत लगावण्यात आला. त्यांच्या निधनानंतर तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि पुढे तुम्ही आमदार झालात हे विसरु नका ! आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला बारागाव नांदूर परिसरातील जनता पाय सुद्धा ठेवू देणार नाही असा गर्भित इशाराही कार्यकत्यांनी दिला.
शिळे तुकडे मोडून आम्ही शेतकरी मंडळ उभे केले असताना कोणीही या मंडळावर दावा करु शकत नाही. आम्ही निर्णय घ्यायला पाहिजे असताना त्यावर कोणीही दावा करु शकणार नाही. शेतकरी मंडळाचा पाठींबा आम्ही शिवाजीराव कर्डिले यांना जाहीर केला आहे आणि त्यात कोणताही बदल केलेला जाणार नाही. लवकरच शेतकरी मंडळाचा जाहीर मेळावा घेतला जाईल आणि त्या मेळाव्यात तुमच्या भानगडींचा पाढा वाचला जाईल असेही यावेळी कार्यकत्यांनी बोलून दाखवले.
यावेळी शिवाजी सागर, अरुण पानसंबळ, अंकुश बर्डे, नजीरभाई काकर, अॅड. भाऊसाहेब पवार, कैलासराव पवार, बाबासाहेब ढोकणे, अरुण गाडे, शिवाजी बाचकर, अनिल पवार, कुलदिप कैलास पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संतोष दिनकर गाडे, छाया अशोक पवार, शहाराम अलोणे, गोपीनाथ क्षिरसागर, अंकुश बर्डे, संजय जाधव, अशोकराव घाडगे, राजेंद्र गाडे, सुरेश डोंगरे, राजेंद्र किसन गागरे, बाळू हापसे, पोपट वलेकर, बबन भालेराव, अशोक माळी, सागर माळी, सागर कांदळकर, सुरज मंडलिक, विनीत मोरे, विलास मंडलीक, बारकू काळे, जगन बर्डे, विजय बर्डे, नितीन गाडे, सचिन गाडे, गोरख बाचकर, नितीन गाडे, योगेश गाडे, अशोक माळी, बबन भालेराव, सचिन गाडे आदी यावेळी उपस्थित होते.
आई- भाऊ आणि संपूर्ण शेतकरी मंडळ माझ्या पाठीशी गाडे
माझ्या सोबत कोणी नाही असे काल दोन-तीन जण म्हणाले. त्यांना मंडळाच्याबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. आमच्यात फूट पाडण्याचे पाप प्राजक्त तनपुरे करणार असेल तर त्याची जबरी किंमत त्यांना मोजावी लागेल. आता तुमच्यावर बुक्का टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माझ्यासोबत कोणी नाही म्हणणाऱ्यांनी आणि त्यांच्या जिवावर राजकारण करण्यास निघालेल्या तनपुरे यांनी माझ्यासोबत माझी आई भाऊ आणि वडिलांनी स्थापन केलेले स्वाभिमानी कार्यकर्त्यांचे शेतकरी मंडळ असल्याची नोंद घ्यावी. हेच मंडळ कर्डिलेंच्या गुलालासाठी आणि तुमच्या बुक्क्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचा दृढ विश्वासही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
घराघरात भांडणे लावण्याचे उद्योग बंद करा !
आमच्या चुलत्यांना हाताशी धरुन आमच्या घरात भांडण लावण्याचे पाप तुम्ही करत आहात असा आरोप यावेळी धनराज
गाडे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावर केला. जे परेले जाते तेच उगवते हे लक्षात ठेवा. तुमचा हा जुनाच उद्योग आहे. तो आम्ही
हाणून पाडणार आहोत. माझ्या वडिलांनाही तुम्ही असाच त्रास दिला. आता तोच त्रास मला द्यायला निघालात तर त्याची
राजकीय किंमत मोजावी लागेल आणि त्यासाठी आता तुम्ही तयार राहा असा इशाराही यावेळी गाडे यांनी दिला.