सावित्रीच्या लेकीला विधानसभेत पाठवा !
सुप्रिया सुळे यांचे आवाहन
पारनेर येथे राणी लंके यांची विराट सभा
पारनेरच्या इतिहासातील पहिलीच विक्रमी सभा
पारनेर : प्रतिनिधी
.नीलेश लंकेला चॅलेंज करू नका, त्याचा नाद करायचा नाही असा विरोधकांना इशारा देतानाच एक कर्तुत्ववान महिला उद्याची सावित्रीची लेक म्हणून विधीमंडळात जाणार असून राणीताई लंके यांना मोठया मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन करतानाच इमानदारी ही आपल ताकद असल्याने मी मते मागते असे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दरम्यान, पारनेर शहराच्या इतिहासात पारनेरचे बाजारतळ महिलांनी खचाखच भरल्याने राणी लंके यांची ही सभा विक्रमी ठरली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पारनेर-नगर मतदारसंघाच्या उमेदवार राणी नीलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाजार तळावर पार पडलेल्या विराट सभेत सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, राणीच्या छोटया घरी ज्यावेळी गेले त्यावेळी माझी भेट झाली. घर लहान पण मन, प्रेम मोठे आहे. नाती काय असतात तर प्रेची असतात, प्रेमाची असतात. शुभकार्य अचडणीच्या काळात माणसे हवी असतात. सत्ता येते जाते, माणसे, प्रेम महत्वाचे असते. राणी आणि नीलेश लंके ही हक्काची माणसे आहेत. राणीला आता आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. हा परिवार हक्काचा असल्याचे सांगतानाच राज्यातील भ्रष्टाचार, महागाई विरोधात ही लढाई असल्याचे सुळे म्हणाल्या.
यावेळी बाबाजी तरटे, बापूसाहेब शिर्के, अर्जुन भालेकर, नितीन अडसूळ, जायदा शेख, सुवर्णा धाडगे, पुनम मुंंगसे, सविता ढवळे, सुरेखा भालेकर, डॉ. विद्या कावरे, कल्पना शिंदे, विद्या गंधाडे, लकी कळमकर, दीपाली औटी, पाकीजा शेख, यांच्यासह हजारो महिला यावेळी उपस्थित होत्या.
▪️चौकट
तुम्ही दणका दिला व सगळया बहिणी लाडक्या झाल्या !
लोकसभेपूर्वी बहिण लाडकी नव्हती का असा सवाल करीत तुम्ही लोकसभा निवडणूकीत दणका दिल्यानंतर मात्र सगळया बहिणी लाडक्या झाल्याचा हल्लाबोल सुळे यांनी केला. राखीच्या धाग्यात तागद आहे. पैसा आणि राखीची तुलना होउ शकत नाही. सरकारने बहिणीला दिड हजार रूपये दिले, दुसरीकडे खाद्य तेलाचे आजचे दर काय आहेत ? बहिणींच्या खात्यावर सहा हजार रूपये आले. निवडणूक आल्यानंतर मात्र योजना बंद करण्यात आल्याची टीका सुळे यांनी केली.
▪️चौकट
स्वाभिमानी महाराष्ट्राचा विजय
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे खासदार विजयी झाले. हा विजय उमेदवारांचा नाही तर स्वाभीमानी महाराष्ट्राचा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतो. तो कधीही झुकणार नाही हे या निकालांनी दाखवून दिल्याचे सुळे म्हणाल्या.
▪️चौकट
ही तत्वाची लढाई
मी भाजपाचे आभार मानते. मला भांडता येत नव्हते. आमचा घात केला. वडीलांचा घात केला. माझ्या आई वडीलांचा नाद करायचा नाही. विरोधक दिलदार असावा. समोरच्याकडेही ऐकूण घेण्याची ताकद लागते. तुम्ही कितीही धाक दाखवा, जेलमध्ये टाका त्याला कोणी घाबरणार नाही. पक्ष चोरला त्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा माझा आरोप आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आम्हाला चार-चार तास बसवून ठेवण्यात आले. कधी कोर्टाची पायरी चढलो नाही, आम्ही थेट सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढलो. ही लढाई चिन्हासाठी नाही तर तत्वाची लढाई असल्याचे सुळे म्हणाल्या.
▪️चौकट
सरसकट कर्जमाफी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही सरसकट कर्जमाफी करू, महागाई कमी करून महिलांचा सन्मान राखणाऱ्या योजना राबवू, भ्रष्टाचाराला आळा घालू रोजगार निर्मीती करू, दुध, कांद्याला रास्त भाव देऊ असे आश्वासन सुळे यांनी दिले.
▪️चौकट
राणीमध्ये झेंडयाची दोरी ओढण्याची ताकद
इथे बसलेल्या सगळयाच राणी लंके आहेत. आपणच उमेदवार म्हणून प्रत्येकीने कामाला लागायचे आहे. आता एकच लक्ष ठेवा तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह. पाळण्याची दोरी व झेंडयाची दोरी ओढण्याची ताकद राणीताईमध्ये असल्याचे सांगत राणी लंके यांच्यासाठी प्रत्येक भगिनीने प्रचारात सक्रिय होण्याचे आवाहन सुळे यांनी केले.
▪️चौकट
नीलेश लंके राज्याचे नेते
खासदार नीलेश लंके हे पारनेर किंवा नगर जिल्हयापुरते मर्यादीत नाहीत. ते राज्याचे नेते आहेत. त्यांना राज्यात प्रचारासाठी वेळ द्यावा लागेल. तुम्हाला त्यांना राज्यात प्रचारासाठी सोडावे लागेल. त्यांना राज्यभरातून मोठी मागणी असल्याचे सांगत त्यांना राज्यात प्रचारासाठी सोडण्याची मी हात जोडून विनंती करते असे सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
▪️चौकट
पारनेरमध्ये विक्रमी सभा
पारनेरच्या बाजारतळावरील राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची ही सभा शहराच्या इतिहासातील पहिली विक्रमी सभा ठरली. पुरूष आणि महिलांचीही इतकी मोठी सभा आजवर या बाजारतळावर झाली नसल्याचे जाणकार मंडळी सांगत होते. विशेष म्हणजे संपूर्ण बाजारतळ महिलांनी भरले होते हे देखील हे या सभेचे वैशिष्ठ ठरले. सभास्थळी जागा न मिळाल्याने हजारो नागरीक बाजारतळाबाहेरील रस्त्यावर उभे राहून सभा ऐकत होतेे.
▪️चौकट
राज्यात सर्वाधिक मतांनी विजय होणार
आजच्या सभेने विक्रम केल्याचे सांगत खा. नीलेश लंके म्हणाले, या मायबाप जनतेमुळे मी विधानसभा, लोकसभेत पोहोचलो. माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत या माता भगिनींचा सिंहाचा वाटा आहे. यांनी निवडणूकीमध्ये स्वतः उमेदवार म्हणून काम केले. बहिण म्हणून पाठीशी उभ्या राहिल्या. या माय माउल्यांनी ही निवडणूक हाती घेतली असून आजच्या सभेची गर्दीच सांगते आहे की पारनेचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होणार आहे.
खा. नीलेश लंके
▪️चौकट
राणी लंके भारावल्या
बाजारतळाच्या इतिहासात प्रथमच मोठया उपस्थितीत होत असलेल्या या सभेपुढे राणी लंके नतमस्तक झाल्या. माता, भगिनींनो तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेल्याचे सांगत ही गर्दी पाहून आजच आपला विजय झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या महिलांना व्यासपीठ मिळत नाही अशा महिलांना या सभेच्या निमित्ताने व्यासपीठ मिळाले आहे. पुरूष असते तर ही संधी मिळाली नसते. मिळालेल्या या संधीचे आण सोने कराार असून तुम्ही मला असेच पे्रेम द्या अशी साद लंके यांनी घातली. तुम्ही मला तुमची कोणतीही समस्या निःसंकोच सांगा तिचे निराकारण करण्याची जबाबदारी माझी असेल अशी ग्वाही देतानाच अर्ज दाखल करण्याच्या सभेसाठी हे ठिकाण अपुरे पडले आता विजयी सभेसाठी दुसरे ठिकाण शोधावे लागेल असे त्यांनी सांगितले.
▪️चौकट
सर्व काही महिलांच्याच हाती !
राणी लंके यांना हंगे येथून सजविलेल्या उघडया जीपमधून सभास्थळी आणण्यात आले. या जीपचे सारथ्य महिला करत होती. सभेचे सुत्रसंचलन महिलाच तर सभेमध्ये भाषणेही महिलांचीच झाली. सभेचे हे वेगळेपण अनेकांना भावले.