पारनेर मतदार संघात मविआला मोठा धक्का, माजी जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश
पारनेर – नगर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असणारे नगर तालक्यातील निबळक गटाचेजिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.यामुळे माविआ ला मोठा धक्का मानला जात आहे.लोकसभेला त्यांनी खासदार निलेश लंके यांचा प्रचार केला होता व ते विधानसभे साठी इच्छुक होते.पण राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी राणीताई लंके यांना अंतिम असल्याचे दिसून येताच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.तेथे त्यांची उमेवारी फायनल मानली जात आहे.यापूर्वी अपक्ष विधानसभा लढवताना त्यांनी तब्बल 44 हजार मते घेतली होती.यावेळी पारनेर मधील लंके विरोधक लामखडे यांच्यासोबत असल्याने काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत.