अनिता बोचरे यांची राज्य मंडळाच्या पर्यवेक्षक पदी पदोन्नती

अनिता बोचरे यांची राज्यमंडळाच्या पर्यवेक्षकपदी पदोन्नती

अहिल्यानगर : साकतखुर्द ( ता. नगर ) येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या अनिता बाळासाहेब बोचरे यांची पुणे राज्य मंडळात पर्यवेक्षकपदी (शाखाप्रमुख ) नुकतीच पदोन्नती झाली आहे. या निवडीप्रसंगी बोचरे यांचा नुकताच मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अर्चना कुलकर्णी, सहसचिव मेधा निरफराके, सहाय्यक सचिव रांगडे, ईडीपी मॅनेजर हेमंत रजपूत, लेखाधिकारी शैलेंद्र पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
या निवडी बद्दल नाशिककर मॅडम, विद्या आहेर, सोरटे आदींनी तर अहिल्यानगर येथून, संतोष मगर , झांबरे,दुधाडे , वामन ,तनपुरे दरेकर,मुंगसे आदींनी अभिनंदन केले. याप्रसंगी सहकारी सेफ सर, किरण पतंगे, रमेश शिंदे , ह.भ.प. भाऊसाहेब मुंगसे, दत्तात्रय चितळकर, सरपंच डॉ. नंदू पवार, उपसरपंच बाबासाहेब चितळकर, मा. सरपंच पाराजी चितळकर, से. सो. अध्यक्ष अशोक शिंदे, ग्रां. पं. सदस्य मोहन वाघमोडे, रामदास चितळकर, किशोर पवार, यांनी कौतुक केले. या निवडी बद्दल अनिता बोचरे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *