*श्री.रामदास म्हस्के व सौ. सत्यभामा रामदास म्हस्के यांचा उद्या मातृ – पितृ पूजन सोहळा…*

 *श्री.रामदास म्हस्के व सौ. सत्यभामा रामदास म्हस्के यांचा उद्या मातृ – पितृ पूजन सोहळा…*

देविदास गोरे….
रुईछत्तिशी – आजकाल समजात अनेक ठिकाणी मोठे सोहळे पहायला मिळतात , सामाजिक , सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते पण उद्या नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक श्री.संतोष म्हस्के व त्यांचे बंधू विकास म्हस्के , राजकुमार म्हस्के यांचे आई – वडील रामदास म्हस्के व सौ.सत्यभामा म्हस्के यांचा मातृ – पितृ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.आई – वडिलांनी दिलेले संस्कार आणि त्यांची माया – ममता आजकाल समाजातून लोप पावत चालली आहे.समाज नव्या उंचीवर गेला पण आई – वडिलांचे उपकार कोणीही मानायला तयार नाही याचीच आठवण म्हस्के परिवारा कडून जोपासली जात आहे.
               प्रत्येकाने आपले कार्य करत असताना आई – वडिलांचे कष्ट विचारात घेतले पाहिजे , जगात सर्वात मोठे तीर्थक्षेत्र कोणते असेल तर ते मातृ – पितृ पूजन होय ! ज्या घरात आज आई – वडील सुखी आहेत त्या घरासारखे पवित्र स्थान दुसरे कोणते नाही हाच संदेश उद्या म्हस्के परिवारा कडून दिला जातो आहे.नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक श्री.संतोष म्हस्के यांनी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून प्रेम , स्नेह , जिव्हाळा वृध्दींगत करावा आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन हे आई – वडिलांच्या पूजनाने करावे असे आवाहन केले आहे.वाळुंज येथील या म्हस्के परिवाराने आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजात नवे आदर्शवत संस्कार निर्माण करतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *