निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनची तयारी युद्ध पातळीवर सुरू !
दीपावलीच्या कालखंडातील कृषी प्रदर्शन ठरणार शेतकरी व व्यवसायिकांसाठी पर्वणी !
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके व मा.जि.प.सदस्या ,सौ. राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार गट ) व निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित ,पी जे,एम, इव्हेंट मॅनेजमेंट काष्टी यांच्या नियोजना खाली सालाबाद प्रमाणे या ही वर्षी दिनांक 17 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
माझ्या शेतकरी बांधवांपर्यंत कृषी क्षेत्रातील वेगवेगळे नवीन तंत्रज्ञान कृषी विषयक माहिती पोहोचवता येईल व नवनवीन अवजारे खते बी बियाणे सह कृषी विषयक विविध उपकरणांचा व माहितीचा त्यांना लाभ होईल हा माणस ठेवून गेल्या अनेक वर्षापासून पारनेर येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते .कृषी क्षेत्रातील पारनेर येथील राज्यस्तरीय कृषीप्रदर्शन महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असून यामध्ये पारनेर सह संपूर्ण महाराष्ट्र मधून नवनवीन तंत्रज्ञानाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे स्टाॅल पारनेरमध्ये मिळविण्या साठीची मागणी व्यापारी वर्गात वाढत असून या वर्षी १५०-२०० स्टाॅल सहभागी होणार आहेत . तालुक्यासह जिल्हा भरातील शेतकरी , कष्टकारी,महिला ,विद्यार्थी व्यावसायिक यांच्या मध्ये कृषी प्रदर्शनला भेट देऊन माहीती घेण्यासाठी उत्सुकता वाढली असुन या वर्षी नेहमी प्रमाणे २ ते ३ लाख शेतकरी बांधव भेट देणार असल्याची माहीती समोर येत आहे .
या कृषी प्रदर्शनामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे डबल हिंदकेसरी सप्तचॅम्पीयन,एक कोटी किमंतीची सोन्या मोन्या बैल जोडी पहावयास मिळणार असून मधुमक्षीका पालन , गोपालन,सैद्रिय,जैविक, रासायनिक खते,नवीन ट्रेक्टर, अवजारे,शेततळी कागद,ठिबक सिंचन, शासकीय अनुदान यांची सर्वसमावेशक माहीती, नर्सरी,दुध काढणी यंत्रे,सुधारीत बि-बीयाणे महिलांना घरबसल्या स्वताचा व्यवसाय चालू करण्याची माहीती, महिलांसाठी गृहपयोगी वस्तुंचे स्टाॅल, खवय्यांसाठी कोल्हापुरचा तांबडा पांढरा रस्सा,तसेच सांगली सातारा कोल्हापुर सह कोकणातील आकर्षक खाऊ गल्ली,लहान मुलांकरीता किड्स झोन असे सर्व समावेशक कृषीप्रदर्शन पहावयास मिळणार असल्याची माहीती नियोजक बंडू पाचपुते व गणेश जठार यांनी दिली, या कृषीप्रदर्शना संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर 9322938447 / 7558394043 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन निलेश लंके प्रतिष्ठान आयोजक मंडळाकडून करण्यात येत आहे .
चौकट :
व्यावसायिकांना कृषी प्रदर्शनाचा फयदा होणार !
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पारनेर येथे राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाचे आयोजन होत आहे गत 4 वर्षा पासुन आमच्या शक्तिमान रोटावेटर या कंपनी चा स्टाॅल या कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी असतो,तसेच यंदा दिवाळीच्या तोंडवर कृषीप्रदर्शन होत असल्या मुळे व्यावसायिक बंधुना याचा फयदा होणार आहे .कृषीप्रदर्शन आयोजन करत शेतकरी बांधवांपर्यंत कृषी विषयक माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून युवा उद्योजकांनाही या माध्यमातून व्यवसायास एक व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल खासदार डॉ श्री निलेश लंके साहेब यांचे मनापासुन आभार.
श्री.रमेश पांढरकर
( वैष्णव ॲग्रो,निघोज )
चौकट :
यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी असून या कृषीप्रदर्शना चा फायदा शेतकरी वर्गासह प्रदर्शना मध्ये सहभागी होणार्या सर्व व्यावसायिक बंधुना होणार आहे ,आमची कंपनीही गेल्या अनेक वर्षापासून निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कृषीप्रदर्शना मध्ये सहभागी होत असुन आम्हाला यापूर्वीही या कृषी प्रदर्शनाचा फयदा चांगल्या प्रकारे झाला आहे .
युनीमॅक्स ॲग्रो, कर्जत