नगर तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करा
तालुक्यातील मविआ नेत्यांची मागणी
नगर तालुका- नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये परतीच्या मान्सून मुळे अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे सोयाबीन, कांदा, तूर यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मविआ नेत्यांकडून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी सभापती रामदास भोर,आप्पासाहेब भालसिंग, संदीप भालसिंग,रामदास अडागळे आदींच्या शिष्टमंडळाने आज उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे यांची भेट घेतली.यावेळी चर्चा करताना त्यांनी सांगितले की नगर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर परतीचा मान्सून पाऊस होत आहे.नगर तालुक्यात या हंगामात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.परतीच्या मान्सून मूळे तालुक्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन, कांदा,संत्रा,डाळिंब फळबागा , तूर या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ते काढता आलेले नाही.अनेक पेरणी झालेले शेत काही दिवसांन पासून पाण्यात आहेत व पुढील महिना ,2 महिने त्या शेतात जाताच येणार नाही अशी स्थिती आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळे तातडीने नुकसानग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.