घराणेशाही.. कारखानदार… दहशत… अन् धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्याचा लढा !

घराणेशाही.. कारखानदार… दहशत… अन् धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्याचा लढा !

 मतदारसंघात वारं फिरलय ! दूधवाला आमदारच  ‘लय भारी’ : कर्डिलेंचा मार्ग सुकर !

सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया

 अहिल्यानगर : नगर -राहुरी- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात घराणेशाही… कारखानदार… दहशत अन् धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार शिवाजी कर्डिले हे लढा देत आहेत. गावोगावी दिवसेंदिवस मिळत असलेल्या वाढत्या पाठिंबामुळे मतदार संघातील वातावरण फिरलय. त्यामुळे कर्डिले हेच विजयी होणार असल्याच्या प्रतिक्रिया पांगरमल गावचे माजी सरपंच बापूसाहेब आव्हाड यांच्यासह मतदारसंघातून व्यक्त केल्या जात आहेत.

      शिवाजी कर्डिले यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे आणि सर्वांच्या सुखदुःखात सामील होण्याची भूमिका यामुळे गावागावातून कर्डिले यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. सर्वसामान्य मतदार, शेतकरी, महिला, व्यापारी, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात कर्डिले यांच्या पाठीशी उभा राहिल्याने मतदारसंघातील चित्र बदलले आहे. आपला शेतकरी दूधवाला आमदारच ‘लय भारी’ अशा प्रतिक्रिया मतदारांमधून व्यक्त होत आहेत. कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांचा ‘होम टू होम’ सुरू असलेला प्रचार अन् शिवाजी कर्डिले, अक्षय कर्डिले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पिंजून काढलेला मतदार संघ. तसेच घरोघरी, शेताच्या बांधावर तर व्यापाऱ्यांच्या दुकानावर कार्यकर्ते प्रत्यक्ष संवाद साधत कर्डिले यांच्या कामाचा लेखाजोखा मांडत आहेत. 

          कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात ‘गरुडझेप’ घेणे हे केवळ सर्वसामान्य जनतेशी असलेले ऋणानुबंध आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्यामुळेच होऊ शकते. विविध विकास कामे मार्गी लावल्याने जनतेने कर्डिले यांच्यावर नेहमीच विश्वास दाखविण्याचे काम केले आहे. कर्डिलेंकडुन अविरतपणे जनतेची सेवा करण्याचे कार्य सुरू असल्याने त्यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क झालेला आहे. याचा फायदा कर्डिले यांना होणार असून कर्डिले यांचा विजय निश्चित असल्याचे मत मतदारांमधून व्यक्त केले जात आहे.

____________________

 ……त्यांना फक्त सत्ता हवी !

विरोधी उमेदवाराकडे परंपरेने राजकीय वारसा आला आहे. कारखाना, दहशत, राजकीय वरदहस्त यामुळे त्यांना फक्त सत्ता हवी आहे. सर्वसामान्य जनता तसेच शेतकरी, महिला, तरुणांचे काहीही देणे घेणे नाही. याची जाणीव मतदार संघातील नागरिकांना झाली आहे. त्यामुळे आता जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही.

…… सोमनाथ हारेर ( माजी सरपंच, खोसपुरी)

___________________

….. मतदारसंघातील वातावरण बदलतंय !

 नगर -राहुरी- पाथर्डी मतदारसंघात संपूर्णतः कर्डिलेमय वातावरण झाले आहे. भाजपा युतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी गावोगावी  उस्फूर्तपणे प्रचार सुरू आहे. मतदार संघातील प्रत्येक गावातून कर्डिले यांना मताधिक्य मिळणार असून मतदारांच्या मनातील आमदार शिवाजी कर्डिले विजयी होणार आहेत.

……… दिनेश बेल्हेकर ( उपसरपंच, जेऊर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *