टोमॅटोचा तोरा उतरला अन लसणाचा वाढला !
आवक घटल्याने भाजीपाला महागला : पावसाअभावी भाजीपाल्याच्या उत्पादनात घट
केडगाव : – काही दिवसांपुर्वी वाढलेला टोमॅटोचा तोरा आता पुरता उतरला आहे . मात्र लसुन व गवार यांचा तोरा वाढत चालला आहे . पावसाअभावी भाजीपाल्याच्या उत्पादनात घट होत असल्याने सध्या भाज्यांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे .
सध्या नगर बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटत असल्याने शहर व उपनगरातील भाजीपाल्याच्या किरकोळ बाजारात भाजीपाला १५ ते २० टक्के महागला आहे .एकीकडे बाजारात हिरव्या भाज्यांची मागणी वाढलेली असताना पावसाअभावी भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले आहे .
मागील महिन्यात टोमॅटो १५० रूपये किलो होता . आता टोमॅटोचे उत्पादन वाढत असल्याने टोमॅटोचे भाव कोसळुन थेट २० रूपये प्रति किलोवर आले आहेत . कांदा १० रूपयांवरून आता ३० रुपये प्रति किलों झाला आहे . लसुण ६० रूपयांवरून थेट १५० रूपये प्रति किलो झाला आहे . गावरान गवारच्या भावात वाढ होऊन ती १५० रूपये प्रति किलो झाली आहे . मेथीची एक गड्डी ५ रूपयांवरून १५ रूपये झाली आहे .
बॉक्स : भाजीपाल्याचे भाव
मेथी – १५ रू
कोथंबीर – ५
कांदा – ३०
अद्रक – १५०
टोमॅटो – २०
लसुन- १५०
मिरची – ३०
काकडी – १०
कोबी – १०
फ्लॉवर – १५
शिमला – ४०
गवार ( गावरान ) – १३०
कोट : सध्या पावसाचे प्रमाण अल्प आहे . त्यात भाजीपाला शेतीसाठी वातावरण पोषक नाही . भाजीपाला पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे . यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले आहे . ” — छबुराव कर्डिले ( शेतकरी , जखणगाव )
कोट -” सध्या किरकोळ भाजीपाला बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे . श्रावण मासामुळे भाजीपाल्याला मागणी वाढत आहे . यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर वाढत आहेत . ” — सुनील लोंढें ( भाजीपाला विक्रेते , केडगाव )