अवैध्यरित्या गोवंशीय जनावरांच्या मांसाची वाहतुक करणारे आरोपी जेरबंद.
अहमदनगर -एमआयडीसी परीसरात शेंडी चौक येथे पिकअपमधुन अवैध्यरित्या गोवंशीय जनावरांच्या मांसाची वाहतुक करणारे आरोपी जेरबंद. पिकअसह, ३०० किलो गोवंशीय जनावरांचे मांस असा एकुण ४,७८,०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त.
एमआयडीसी पोलीसांची कामगिरी,
अहमदनगर करुन औरंगाबाद रोडने एक पिकअप नबंर एम. एच.२० ई एल २३५६ हि येत आहे. सदर पिकअपमध्ये गोवंशीय जनावरांचे मांस आहे. अशी माहिती रविवार दि २० रोजी सायकांळी पाच वाजता मिळाल्याने पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार केले. शेंडी बायपास रोड शेंडी चौक येथे सापळा लावला. व सदर पिकअपला ताब्यात घेतले. सदर पिकअपमधील चालकाला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) मोहमंद वसिम नसिम रा.गांधी पुतळयाजवळ छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले. तसेच त्याचे शेजारी बसलेल्या इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे २) पप्पु भाई रा.झेंडीगेट अहमदनगर ३) मोहम्मद साईद आलम वय ४२ रा. संभाजीनगर ४) बनारसी बाबु संगु हारी वय ५० वर्ष रा. गांधीपुतळयाजवळ संभाजी नगर असे सांगीतले त्यांना सदर पिकअप मध्ये काय आहे याबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर पिकअपची इ डती घेतली असता सदर पिकअपमध्ये ३०० किलो गोवंशीय जनावरांचे मासं मिळुन आले. तसेच एक पिकअप गाडी नंबर एम एच २० ई एल २३५६ असा एकुण ४,७८,०००/-रु किमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावरुन एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि. नंबर ७७१ / २०२३ भादवि कलम ४२९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ ( ब ) ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर, प्रशांत खरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पो.हे.कॉ रमेश थोरवे, पोहेकॉ महमंद शेख, पोना दिपक गांगर्डे ,भागवत, पोना,सुद्रीक,भगवान वंजारी, दहिफळे, ज्ञानेश्वर तांदळे, किशोर जाधव, यांचे पथकाने केली आहे.