केंद्र सरकार कांदयाच्या निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क करण्याचे जे परिपत्रक काढले आहे ते परीपत्रक तातडीन रद्द करावे
अहमदनगर -केंद्र सरकार कांदयाच्या निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क करण्याचे जे परिपत्रक काढले आहे ते परीपत्रक तातडीन रद्द करावे.अन्यथा तीव्र आंदोलनात सामोरे जावे लागेल असा इशारा भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र राज्याचे नेते घनश्याम शेलार यांनी दिला आहे.
नेप्ती उपबाजार समिती येथे भारत राष्ट्र समितीच्या वतीने केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत काढलेल्या परीपत्रका संदर्भात जाहीर निषेध शेतकऱ्यासमोर नोंदविला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शेलार म्हणाले केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लागू केला आहे हे जे परिपत्रक काढले आहे या देशातल्या व राज्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारी परिपत्रक आहे. मागील नऊ वर्षाचा हिशोब केला तरी एकदा कांद्याला ७० रुपये भाव मिळाला होता त्यानंतर कधीतरी शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस जेमतेम परवडेल असा भाव मिळाला आहे. बाकी नेहमीच शेतकऱ्यांच्या कांद्याला तोट्यात जाण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अशा प्रकारे भाव वाढ शेतकऱ्यांनी मिळाली. मात्र आता यावर्षी कांद्याचा थोडा भाव वाढला तर लगेच केंद्र सरकारने या शेतकऱ्यावर अन्याय करणारे धोरण घेतले. 40 टक्के निर्यात शुल्का आकारून कांद्याचे दर पाडण्याचे काम केले हे निषेधार्थ गोष्ट आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या देशाच्या सरकारने हमीभावापेक्षा कुठलाही मालाला कमी भावात घेतला जाणार नाही याच्यासाठी कायदा केला पाहिजे. शेतकऱ्यांची नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. दोनशे रुपये टोमॅटो झाले आता टोमॅटो आयात करून 20 रुपये किलोवर आणली. शेतकऱ्यांनी टोमॅटोचे ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर ओतून दिले त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली नाही. आता बाजार वाढले की लगेच बाजार भाव कमी करायची म्हणून शेतकऱ्याला अन्याय करण्याची भूमिका घेत आहे. या सरकारने शेतकऱ्यावरील होणारे अन्याय तातडीने थांबवले नाही तर सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेलार यांनी दिला. यावेळी शरद पवार म्हणाले केंद्र सरकारने शेतकरी विरोधात निर्णय घेतले आहे. यामुळे सर्व सामन्य शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतक ऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला की सरकार लगेच कमी भाव करते. या केद्र सरकारचा भारत राष्ट्र समितीच्या वतीने जाहीर निषेध करतो. यावेळी भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्याचे नेते घनश्याम शेलार , जिल्हा समन्वयक शरद पवार , प्रदीप शिंदे, बाळासाहेब कातोरे, पारनेर तालुका समन्वयक संतोष वाडेकर, भगवान बोठे, दत्ता तोडमल, रोहन पवार, महादेव खडके, मारुती लांडगे, दिंगबर शेलार, दिलीप पवार, राजेंद्र पवार, स्वप्नील पवार, संजय पवार, रावसाहेब कोकाटे, गंगाराम कासार, कल्याण कोकाटे, संतोष कोकाटे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.