संस्कारक्षम शिक्षणाशिवाय पर्याय नाही – श्री भास्कर पाटील ( शिक्षणाधिकारी प्राथ.जि.प.अहमदनगर)
हिवरेबाजार दि.१४ जुलै २०२३ – जि.प.प्राथ.शाळा हिवरेबाजार ता.नगर येथे संगणक कक्ष व ए.पि.जे.अब्दुल कलाम सायन्स व टेक्नोलॉजी इनोव्हेशन प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अहमदनगर चे शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील यांनी हे उद्गार काढले. या प्रसंगी हिवरेबाजार च्या शाळा व्यस्थापन समितीचे त्यांनी कौतुक केले.पालक शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्रित प्रयत्न केले तर अशी प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नातील शाळा निर्माण होवू शकते. यावेळी त्यांनी शाळेतील सर्व उपक्रमांची माहिती घेतली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांच्या उत्तराने भारावून जात त्यांनी शाळेला भविष्यात प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी सर्वाना सांगितली . शाळेच्या स्वच्तेचे विशेष कौतुक केले
या वेळी पद्मश्री डॉ .पोपटराव पवार हे देखील उपस्थित होते.त्यांनी सर्वांचे स्वागत केले व मार्गदशन केले. तंत्रज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा हा हेतू या शाळेत निश्चित साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . जीवनात सकारात्मक बाबींचे अनुकरण करा व नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा असा सल्ला त्यांनी सर्वाना दिला.
या वेळी अहमदनगर रोटरी क्लबचे श्री देशमुख साहेब ,केंद्रप्रमुख श्री बाळासाहेब दळवी,श्री उदय सोनावळे,सरपंच सौ विमलताई ठाणगे,शा.व्य.स.अध्यक्ष सौ अर्चना ठाणगे ,चेअरमन श्री छबुराव ठाणगे ,व्हा.चेअरमन श्री रामभाऊ चत्तर,व पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक श्री भास्करराव खोडदे,सौ सुलभा दळवी,सौ सुवर्णा ढवळे,सौ रुपाली पवार,सौ शोभाताई पवार,श्री विजय ठाणगे यांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेचे मुख्याध्यापक श्री देवराम बोरुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.