गुंडेगाव गणातून महिलांची शिर्डी वारी..*
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील गुंडेगाव गणातील वडगाव , गुणवडी या गावातून खासदार सुजय विखे यांनी महिलांचे शिर्डी व शिंगणापूर दर्शन घडवून आणण्याचे नियोजन केले आहे.गेल्या एक महिन्यापासून खासदार विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून महिलांची शिर्डी वारी तर नगर उत्तर मतदारसंघातून पंढरपूर दर्शन घडूवन आणण्याचे केलेले नियोजन अतिशय पारदर्शी असल्याचे जाणवत आहे.आज गुणवडी , वडगाव या गावातून महिलांची बस शिर्डी दर्शनासाठी रवाना झाली.आगामी काळात नगर तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद गटातून महिलांचे दर्शन घडवून आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासदार विखे यांनी नगर तालुक्यात गावागावात निधी देऊन अनेक विकास कामे घडवून आणली आहेत.नगर तालुक्यातील १०८ गावापैकी जवळपास ८० गावात भाजपचे सरपंच आहेत त्यामुळे नियोजन करण्यासाठी विखे यांना गावातील सर्व पदाधिकारी यांचा मोठा उपयोग झाल्याचे पहायला मिळत आहे.आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका भाजपने जिंकण्यासाठी हे नियोजन विखे यांनी केल्याचे बोलले जाते.गावागावातून जास्तीत जास्त महिलांची वारी करण्याचा विखे यांचे नियोजन नक्कीच राजकीय पायंडा मानला जात आहे.नगर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी विखे यांच्या नियोजनात सहभागी होऊन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची यंत्रणा देखील कामाला लागली आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जिंकणे हे भाजपचे धोरण असणार आहे.