जास्तीत जास्त महिलांना शिर्डी , शिंगणापूर दर्शन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील – सरपंच शरद बोठे व माजी सरपंच स्वाती बोठे यांची माहिती..
देविदास गोरे
रुईछत्तिशी – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महिलांना शिर्डी व शिंगणापूर दर्शन घडवून आणण्याचे पारदर्शी नियोजन केले आहे.आगामी लोकसभा , विधानसभा , जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुका पार्श्वभूमीवर या महिलांच्या वारीला महत्व प्राप्त झाले आहे. सध्या नगर तालुक्यातील वाळकी गटातून महिलांनी वारी सुरु करण्यात आली आहे.नगर तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून वाळकी गावची ओळख आहे.खासदार सुजय विखे पाटील , माजी मंत्री शिवाजी कर्डिले , माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या नियोजनातून मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते भाजपच्या राजकीय रणनीती साठी पुढे सरसावले आहेत.वाळकी गावातून जास्तीत जास्त महिलांची शिर्डी व शिंगणापूर वारी कशी घडवून आणता येईल यासाठी गावचे लोकनियुक्त सरपंच शरद बोठे व माजी सरपंच स्वाती बोठे प्रयत्नशील आहेत.जवळपास १० ते १२ हजार लोकसंख्येचे वाळकी गाव असल्याने राजकीय दृष्ट्या या गावावर अनेक गणिते अवलंबून असतात त्यामुळे तालुक्याच्या प्रत्येक क्षेत्रात या गावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. लोकनियुक्त सरपंच शरद बोठे यांनी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार बबनराव पाचपुते यांच्या निधीतून गावासाठी मोठा निधी आणला आहे.आगामी काळात देखील अनेक विकासकामे मार्गी लावण्याचे धोरण असल्याचे सरपंच शरद बोठे यांनी सांगितले.
वाळकी गावातून प्रत्येक वाडी वस्तीवरील महिलांना जास्तीत जास्त शिर्डी दर्शन घडवून आणण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. महिलांना प्रत्येक कार्यात सामावून घेण्याची भूमिका माजी सरपंच स्वाती बोठे यांनी घेतली आहे. भाजपच्या कार्यकाळात वाळकी गाव चांगलेच प्रकाशझोतात आल्याने गेल्या दहा ते बारा वर्षापासून या गावात माजी मंत्री शिवाजी कर्डिले गट व भाजपची एकहाती सत्ता आहे. खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून गावातील सामान्य नागरिकांना बऱ्याच सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील सरपंच शरद बोठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे.गावासाठी रस्ते , वीज , शिक्षण , पाणी , कृषी , जनसुविधा , सहकार या सर्व सुविधा मार्गी लावण्यासाठी मोठा निधी मिळवला जाईल असेही सरपंच बोठे यांनी सांगितले.