अहमदनगर – ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं, ज्यांच्यामुळे समाजात मान मिळाला, उच्च पदावर नोकरी करण्याची संधी मिळाली अशा गुरूजणांचा सन्मान सोहळा निंबळक येथील माजी विदयार्थीनी केला.
निंबळक ( ता. नगर ) येथील १९९०-९१ सालच्या माजी विदयार्थीनी सेवानिवृत्त शिक्षकांचा गेट टु गेदर व कृतज्ञता गौरव सोहळयाचे आयोजन केले होते. सोहळ्याचे अध्यक्ष संतोष भालेराव गुरुजी होते होते. या सोहळ्यासाठी किसन केदार, गंगाधर लांडे, निवृत्ती बांगर,विठ्ठल काळे, रावसाहेब सोनवणे,संतोष भालेराव,
शशिकांत इथापे, मिनाक्षी विजय दगडे , मंगला होमकर,बबनराव सातपुते,भाऊसाहेब कोतकर ,
पुष्पा औटी, देविदास गडाख, भानुदास कोतकर,
नंदकुमार तोडमल, संजय गेरंगे. गंगाधर घोलप.
दत्ता मुठेउपस्थित होते. यावेळी भालेराव म्हणाले या माजी विदयार्थोनी सेवा निवृत्त होऊन पंचवीस वर्ष झालेल्या सेवा निवृत्त शिक्षकांचा सन्मान सोहळा कार्यक्रम घडवून हा वेगळा उपक्रम घडवला.
विदयार्थीनी जुन्या आठवणीना उजाळा देण्याचे काम केले. प्रथमच असा कार्यक्रम झाला. शिक्षकाचे गेट टु गेदर हि वेगळीच संकल्पना या विद्यार्थांनी सुरू केली.आम्ही घडवलेले विदयार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहे. विदयार्थी सन्मान हा इतर पुरस्कारा पेक्षा सर्वात मोठा सन्मान आहे. या सोहळ्यामुळे आम्हा सर्व शिक्षकांची उंची वाढली आहे. आमच्या काळात शिक्षकाना पहिल्या वर मुले पळून जात होती.आता चेंडू फेका सर अशी परीस्थिती झाली. यावेळी शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणी सांगीतल्या. त्या काळातील विदयार्थीला लावली जाणारी शिस्त, मुले कसे शिक्षकांना घाबरत होते हे सांगीतले.शिक्षकांनी आपल्याला समाजात मान, उच्च पदावर जाण्याची संधी मिळाली अश्या गुरुजणांचा सन्मान करण्यात आला , गावात वाजत गाजत त्यांची मिरवणुक काढण्यात आली. या सोहळ्यासाठी माजी विदयार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

