नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांची साकळाई योजनेवर वक्रदृष्टी.

 नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांची साकळाई योजनेवर वक्रदृष्टी.
केंद्र व राज्य सरकारकडून योजना वारंवार दुर्लक्षित…

देविदास गोरे.

रुईछत्तिशी – नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई योजना आज अधांतरी राहिली की काय ! याची चर्चा रंगू लागली आहे.मागील दोन महिन्यांपूर्वी या योजनेच्या सर्व्हेसाठी निधी टाकण्यात आला.अधिकारी यांनी डोंगर माथ्यावर जाऊन याची पाहणी केली पण आज ही योजना कोणत्या अवस्थेत आहे ! सर्व्हे किती पुर्ण झाला ! सर्व्हे करण्यासाठी आमदार , खासदार यांनी किती फॉलोअप घेतला , कोणत्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे केल्याची नोंद सरकारकडे केली याची चर्चा ३५ गावातून होऊ लागली आहे.गेल्या महिन्यापासून या भागात दुष्काळाचे वादळ घोंघावते आहे. साकळाई योजनेला विरोध करणारी पुण्यातील राजकारणी मंडळी देखील सरकारमध्ये सहभागी झाली आता या भागातील शेतकऱ्यांची वक्रदृष्टी साकळाई योजनेकडे लागली आहे. भीमा नदी खोऱ्यातील शेतकऱ्यांना कधीच दुष्काळ जाणवत नाही याच भीमा नदी खोऱ्यातील पाणी साकळाई योजनेतून नगर श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी ही योजना गेल्या ३० वर्षापासून पुढे आली.राज्य व केंद्र सरकारने संयुक्तरीत्या ही योजना मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली.आंदोलन झाल्यानंतर सरकारने या योजनेच्या सर्व्हेसाठी निधी टाकून मान्यता दिली , सर्व्हेच्या हालचाली सुरू झाल्या पण योजना गतिमान होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पाऊले उचलली जात नसल्याने या भागातून सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
          सध्या दुष्काळाचे वादळ घोंगावत असल्याने या भागातील शेतकऱ्यांची वक्रदृष्टी या योजनेच्या पाण्यावर पडली आहे.या जिरायती पठारी भागाला हे पाणी लवकर उपलब्ध झाले तर या भागातील शेतकऱ्यांची सिंचन समस्या मार्गी लागणार आहे.जिरायती भागाला वरदान ठरणारी ही योजना सरकारच्या अजेंड्यातून वारंवार दुर्लक्षित होते.सध्या खरीपाची पिके पूर्णपणे उन्मळून चालली असताना कोणत्याही प्रकारचे हक्काचे पाणी या भागात नाही त्यामुळे या योजनेची आता नितांत गरज जाणवू लागली आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती सधन होण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा वज्रमूठ बांधणे गरजेचे आहे.आपल्या हक्काचे पाणी मिळवायचे असेल तर आता साकळाई उपसा सिंचन योजनेवर मदार ठेवली पाहिजे हीच जनजागृती झाली पाहिजे.आगामी काळात नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांनी निवडणुक पार्श्वभूमीवर एल्गार पुकारला पाहिजे.मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत झालेल्या घोषणा पूर्णत्वास गेल्या पाहिजेत यासाठी या भागतील शेतकऱ्यांनी पुन्हा जागे होण्याची गरज आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *