भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाच्या उत्तर महाराष्ट्र सह संयोजक पदी बबनराव शेळके यांची निवड करण्यात आली.भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप यांनी निवड केली
भाजप प्रदेश कार्यालय, नरिमन पॉईंट, मुंबई येथे भाजप पंचायतराज व ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र प्रदेश ची राज्यस्तरीय बैठक पार पडली. तसेच “नमो पंचायतराज” या केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची पूर्ण माहिती असलेले पुस्तक भाजप प्रदेशाध्यक्ष .चंद्रशेखरज बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशन व राज्य विभाग जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. भाजपा पंचायत राज व ग्राम विकास स विभागाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक पदी (नाशिक ,धुळे ,नंदुरबार, जळगाव ,अहमदनगर उत्तर, अहमदनगर दक्षिण व मालेगाव यांचा समावेश) निवड करण्यात आली,.. यावेळी भाजप पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे प्रदेश संयोजक .गणेश जगताप,सहसंयोजक जीव शर्मा, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, कार्यालयीन प्रभारी रवी अनसापुरे, अंकुश देशमुख, रोहिदास धुमाळ,सुधीर धुमाळ, समाधान गायकवाड,.माऊली वाघमोडे, रणजित फाळके, प्रसादजी कुलकर्णी ,वैशाली नागरे, उमाताई तायडे, संजय कदम ,अंबादास शेळके, अमोल खेडकर ,सागर बोरुडे उपस्थित होते .गेल्या 17 – 18 वर्षापूर्वी चिचोंडी पाटील सारख्या मोठ्या गाव मध्ये भारतीय जनता पार्टीची पहिली शाखा स्थापन करण्याचे काम केले. भारतीय जनता पार्टीचे विचार व पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याची काम केले, पक्षाचे विचार तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत, पोहोचण्याचे काम केले. सर्वसामान्य जनतेसाठी आंदोलने ,उपोषण ,विविध प्रकारच्या शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम शेळके यांनी केले. गेल्या 20 वर्षापासून मोतीबिंदू शिबिरांच्या माध्यमातून 15000 पेक्षा जास्त गोरगरीब वयोवृद्धांचे मोफत नेत्र शस्त्रक्रिया करून 8 ते 10 कोटी रुपये अहमदनगर व बीड जिल्ह्यातील नागरिकांचे वाचवून त्यांना एक प्रकारे नेत्र देण्याचे काम केले . भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून पक्षाचे काम करणाऱ्या शेळके यांची प्रदेश कार्यालयाने दखल घेत त्यांची उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक पदी निवड केल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये नागरिकांमध्ये आणि पक्षाच्या कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेळके यांनी पक्षासाठी केलेल्या कामांचे फळ आज त्यांना मिळालेले आहे अशी भावना सुद्धा जनतेमध्ये पसरली असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे. त्यांचे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे , खासदार सुजय विखे पाटील ,माजी मंत्री, तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले ,आमदार बबनराव पाचपुते , अहमदनगर दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष आदरणीय दिलीप भालसिंग ,अहमदनगर शहराचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, प्रदेश चिटणीस आदरनिय अरुण मुंडे यांनी अभिनंदन केले.