बुधवार पासून रंगणार नगर तालुका क्रिडा स्पर्धाचा

 बुधवार पासून रंगणार नगर तालुका क्रिडा स्पर्धाचा थरार

पाच ठिकाणी होणार स्पर्धा
१४, १७, १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थी घेणार सहभाग
केडगाव : नगर तालुका शालेय क्रीडा स्पर्धांना बुधवार दि.६ पासून सुरुवात होत आहे. स्पर्धा २७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. एकूण पाच ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. यात १४ ते १९ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडू सहभागी होणार आहेत. अशी माहिती नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे यांनी दिली.
अरणगाव येथील वर्का शाळेत बुधवारी (दि.६) रोजी तालुका क्रिडा सामन्याचा शुभारंभ होणार आहे. दोन दिवस व्हॉलीबॉलचे सामने होणार आहेत.
सोमवारी (दि.११) व मंगळवारी (दि. १२) निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात मुला- मुलींच्या कुस्ती, बुधवारी (दि.२०) गुरुवारी (दि. २१) व शुक्रवारी (दि.२२) विद्यालयात १४, १७ व १९ वयोगटातील (दि.२५), मंगळवारी (दि.२६) व बुधवारी (दि. २७) रुईछत्तीसी येथील जनता विद्यालयात खो-खो खे सामने रंगणार आहेत.आगडगाव येथील श्री भैरवनाथ मुला- मुलींच्या कबड्डी स्पर्धांचा थरार रंगणार आहे. सोमवार (दि.४) व मंगळवार (दि.५) ऑक्टोबर ला वाडिया पार्कच्या मैदानावर मैदानी स्पर्धा होणार आहेत. यात १४ ते १९ वयोगटातील मुले-मुली खेळाडू सहभागी होतील. या सर्व सामन्यांसाठी निमगाव वाघाचे ज्येष्ट क्रिडा शिक्षक चंद्रकांत पवार, अभिजित शेरमले, ऋषी शिंदे, अनिल शिंदे, वैभव शिंदे, समीर पटेल, मल्हारी कांडेकर, रमाकांत दरेकर, त्र्यंबक साळुंके, रवींद्र हंबर्डे, मिलिंद थोरे, बाळासाहेब बोडखे, दत्ता पाटील नारळे, भाऊ पवार, प्रताप बांडे, उन्मेश शिंदे, दिनेश भालेराव, संतोष ठाणगे, बाळासाहेब मुळे, आशिष आचारी आदी क्रीडा शिक्षक सामना मार्गदर्शक राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *