रात्रीचे थ्री फेज लोडशेडींग बंद करून,वीजपुरवठा पूर्ववत ठेवा
आठ दिवसानंतर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करणार
महाविकास आघाडीचा इशारा
नगर ब्रेकींग न्यूज -रात्रीचे थ्री फेज लोडशेडींग बंद करून,वीजपुरवठा पूर्ववत ठेवा अन्यथा महावितरण कार्यालया समोर आंदोलन केले जाईल असा इशारा महाविकास आघाडीने कार्यकारी अभियंता याना दिला आहे या बाबतचे निवेदन हि दिले आहे.
, जिल्ह्यासह नगर तालुक्यात पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक शेतकरी बांधवांना शेतीसाठी तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
काही शेतकरी बांधवांकडे त्यांच्या बोरवेलला जे काही थोडेफार पाणी आहे ते उपलब्ध पाणी त्यांच्याकडे असणाऱ्या शेतीस देण्यासाठी विजेची आवश्यकता आहे.त्यातच आपल्या विभागाने मागील काही दिवसांपासून रात्रीचे वीज लोडशेडींग वाढविल्याने ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे,अशा शेतकरी बांधवांना या अतिरीक्त लोडशेडींग मुळे ते देणे शक्य होत नाही.तरी आपण या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा विचार करा आणि तालुक्यातील शेतकरी बांधवांना रात्रीचे देखील पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यात यावा ही विनंती करतो.
अन्यथा येणाऱ्या आठ दिवसानंतर कधीही, आपल्या कार्यालयावर महाविकास आघाडी नगर तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल . आणि त्यासाठी सर्वस्वी आपण व आपले प्रशासन जबाबदार असेल. यावेळी,बाळासाहेब हराळ,प्रकाश पोटे, रामदास भोर,रोहिदास कर्डीले,गोरख काळे,निखिल शेलार,शेखर पंचमुख,अमोल झेंडे,आदी उपस्थित