नगर तालुका काँग्रेस कमिटी आयोजित जनसंवाद पदयत्रेचा शुभारंभ
अहमदनगर – संवाद यात्रेच्या दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती होणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यानी सवांद यात्रेच्या माध्यमातून जनतेमध्ये जायचे आहे. नियुक्त केलेल्या मंडल प्रमुखानी गावापर्यत जायचे लोंकाशी सवांद साधायचा आहे, प्रत्येक गणात तालुका अध्यक्षानी मंडल प्रमुखाबरोबर सहभागी व्हायचे आहे. मी सुध्दा या सवांद यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. जिल्हयात बारकाईने लक्ष घालणार असल्याचे माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगीतले.
नगर तालुका काँग्रेस कमिटी आयोजित जनसंवाद पदयत्रेचा शुभारंभ अहमदनगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामधील पंडित जवाहरलाल नेहरू यांना बंदी वासात ठेवलेल्या खोली मधील प्रतीमेस अभिवादन करून जनसंवाद यात्रेचा
महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी काँग्रेसने जनसंवाद यात्रेची घोषणा केली आहे.भाजप सरकारचा भ्रष्ट कारभार, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि अन्य मुद्द्यांवर आवाज उठवला जाणार आहे. ही जनसंवाद यात्रा अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये जाणार असून प्रत्येक गावामध्ये केंद्र सरकारने लादलेल्या महागाई भ्रष्टाचार आणि शेतकरी बेरोजगारांच्या प्रश्नाबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे अशी या यात्रेची रूपरेषा तयार केली असल्याचं थोरात यांनी सांगितले .नगर तालुक्यातील १o५ गावामध्ये जनसवांदयात्रेचे नियोजन करण्यात आले असल्याचे नगर तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष अरुण म्हस्के यांनी सांगीतले
यावेळी आ. लहुजी कानडे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नागवडे, युवक जिल्हा अध्यक्ष स्मितल वाबळे, महिला आयोगाच्या सचिव उत्कर्षां रुपवते, महाराष्ट्र प्रदेश चे सचिव हेमंत ओगले, सचिन गुंजाळ, नगर तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके , जिल्हा सहकारी बँकेचे मा व्हा उपाध्यक्ष संपतराव म्हस्के,जिल्हा समन्व्यक ज्ञानदेव वाफारे साहेब तसेच जयवंत राव वाघ काँग्रेस तालुका उपाध्यक्ष भरत बोडखे, शरद गुंजाळ, शशिकांत गावडे, रमेश गावडे, बाबासाहेब सय्यद, उपाध्यक्ष संदीप पुंड ,प्रदीप गाडेकर, गणेश गावंडे, संदीप शिंदे, साहेबराव बोडखे, सोमनाथ भोईटे, तसेच नगर तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.