संदीप दादांच्या याच कॅमेरा तुन साकारणार केडगावचे ‘ उज्ज्वल भविष्य ‘ !
नगरकरांचे श्रद्धास्थान असणारे केडगावच्या रेणुकामातेचे ठाणे ही श्रीक्षेत्र पुण्यभूमी. केडगाव गाव नगर शहरापासुन हाकेच्या अंतरावर आहे . नगर – पुणे राज्य मार्गालगत असुनही केडगावचे शहरीकरण होण्यास ६० वर्ष लागले .आजही महापालिकेचे मोठे उपनगर असणारे केडगाव एखाद्या खेडेगावापेक्षा दयनीय अवस्थेत आहे .केडगावने आजही आपले गावपण टिकवुन ठेवले आहे.
नगर शहराला केडगाव शहरात आल्याचे नेहमीच खटकत राहिले . यामुळे केडगावला नेहमीच सावत्र मुलाची वागणूक मिळाली . ती आजही ( २०२४ ) मध्ये सुरू आहे .केडगावचे माणसं सहनशिल आहेत म्हणुन आजपर्यंत हे व्यवस्थीत सुरू आहे .
जुन्या काळात मोठ मोठे नेते केडगावला निवडणूकीच्या प्रचाराला यायचे पण केडगावचे प्रश्न कधीच सुटले नाही . निवडणुकीत मोठ मोठे नेते येतात याचा अर्थ केडगावची राजकीय ताकद वेगळी होती .एक गठ्ठा मते मिळायची .
केडगावचा फक्त एकच प्रश्न होता पाण्याचा . दहा -दहा दिवस पाणी येत नव्हते . पाणी आले तर पंधरा विस मिनीट यायचे . तेव्हा सोनेवाडी तलावातुन केडगावला पाणी यायचे . त्यासाठी गावात १ लाख लिटरची उंच टाकी बांधण्यात आली . हा तलाव आटला की केडगाव तहानलेले असायचे . केडगावकरांनी पाण्यासाठी ज्या हालअपेष्टा सहन केल्या त्या कोणीच करू शकले नाही .केडगावला पाण्याची बोंब म्हणुन कोणीच केडगावला राहायला येत नसत .
केडगाव म्हणजे पाण्याची साडेसाती असणारे गाव अशीच केडगावची ओळख बनली .केडगावचा माणूस कुठंही गेले की समोरचा प्रश्न विचारायचा ‘ आता केडगावला पाणी येतं की नाही ? ‘ त्यानंतर २ कोटी रूपयांची योजना वसंत टेकडी ते केडगाव ( नऊ इंच पाईन लाईन ) अस्तित्वात आली .बालाजी कॉलनी येथे चार लाख लिटरचा संपवेल बांधण्यात आला . पण त्याने काही दिवस भागले मात्र मुळ पाणी प्रश्न सुटला नाही .केडगावकरांची पाण्यासाठी वणवण संपली नव्हती . सारखे रास्ता रोको , आंदोलने व्हायची . त्याच्या बातम्या यायच्या . केडगावला पाणी येत नाही म्हणुन कोणी बाहेरचे केडगावला राहायला येत नव्हते .
सन १९९९ ला शहर हद्दवाढ झाली . केडगाव ग्रामपंचायतचे अस्तित्व संपले . नगरपालिकेत केडगाव गेले . शहरात गेल्याने आता केडगावचे प्रश्न सुटतील . पाणीप्रश्नाची साडेसाती संपेल असे वाटले . पण झाले उलटेच . त्यावेळी केडगावचा २ कोटीचा महसुल फक्त नगरपालिका वसुल करीत राहिली . फक्त केडगावची ग्रामपंचायत महापालिकेने ताब्यात घेतले .केडगाव शहरात गेल्याने केडगावाचा एक दगड ही दुसरीकडे हलवला गेला नाही . नगरपालिकेत गेल्याचे केडगावचे स्वप्न भंग पावले .
यानंतर २००३ मध्ये नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले . कर वाढले तरिही केडगावच्या पाणीप्रश्नाची साडेसाती संपली नाही . महापालिकेपेक्षा केडगावची ग्रामपंचायत बरी होती , अशी म्हणण्याची वेळ आली .
सन २००६ च्या काळात केडगाव पाणीप्रश्नाच्या रूपाने एक भगिरथ नगरसेवक झाला . संदिप भानुदास कोतकर हे केडगावचे नवतरुण नगरसेवक झाले . अडिच वर्षानंतरच नगर शहराचे महापौर बनले . त्यांनी केडगावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची खुणगाठ मनाशी बांधली .केडगावच्या पाणी प्रश्नाचा बारकाईने अभ्यास सुरु झाला .केडगावच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपवणार असे आश्वासन संदीप कोतकर यांनी महापौर होताच केडगावच्या लोकांना दिले . तेव्हा संदिप दादा कोतकर यांनी दिवगंत केंद्रिय मंत्री विलासराव देशमुख यांच्या माध्यमातुन लहु व मध्यम शहराच्या विकास योजनांचा अभ्यास केला . आणि यातुनच २००८ मध्ये केडगावच्या नव्या पाणी योजनेचा जन्म झाला . केडगावच्या भरभराटीला कारण ठरणारी व सर्व केडगावकरांचे
भविष्य उज्ज्वल ठरणारी फेज १ म्हणजे केडगावची सुधारीत ४४ कोटी रूपयांच्या पाणी योजनेला संदिप कोतकर यांच्या सातत्याने होणाऱ्या दिल्लीवारीने मंजुरी मिळाली .
विळद पंप हाऊस ते केडगाव अशी बायपास मार्गे केडगाव उपनगरासाठी स्वतंत्र पाणीयोजना मंजुर झाली . त्यासाठी एकनाथनगर येथे मुख्य संतुलन टाकी , ओंकारनगर, मोहिनीनगर , भूषणनगर , लोंढें मळा अशा विविध ठिकाणी पाणी साठवण टाक्या बांधुन केडगावची सुधारीत पाणी योजना अस्तित्वात आली . मुळात ती इतक्या सहजासहजी झाली नाही .यात शेत जमिन मालक , शासकीय अधिकारी , राजकीय विरोधक , उद्योजक आडवे आले . पण या सर्वांना केडगाव स्टाईल आडवे करीत संदिप दादांनी मोठ्या पाठ पुराव्यानंतर केडगावला पाणी आणलेच .
पण जेव्हा ही योजना अस्तित्वात आली तेव्हा केडगावची लोकसंख्या ७० हजाराच्या आसपास होती . तेव्हा ही योजना २५ वर्ष टिकेल असे भविष्याचे नियोजन होते . पण जेव्हा केडगावला नविन पाणी योजना आली आणि केडगावची भरभराट सुरू झाली तेव्हा ८ दिवसानंतर सुटणारे पाणी दोन दिवसाआड सुरू झाले .केडगावची पाण्याची साडेसाथी संपली .पाण्यासाठी महिलांची वणवण बंद झाली . हे केवळ संदिप कोतकर यांनी राबवलेल्या पाणी योजनेमुळेच .
केडगावमधील रस्त्यांची अवस्था एखाद्या वाडी वस्तीवरच्या रस्त्याहुन भयानक आहे . पण पाणी जीवन आहे . पाण्यावरच केडगावच्या विकासाची जडणघडण होणार आहे .
केडगावात नव- नव्या वसाहती , मोठ मोठ्या अपार्टमेंट , फ्लेंट सिस्टिम, भव्य स्किम , नविन घरकुले , मॉल सिस्टिम केडगावात सुरू झाली . आता केडगावची लोकसंख्या केव्हाच १ लाखांच्या पुढे गेली .केडगावचे पाणी शेजारी -पाजारी असणाऱ्या वसाहतीत जायला लागले . काही दिवसांनी हे पाणी कमी पडणार आहे . आज दोन दिवसांनी येणारे पाणी पुन्हा आठ दिवसांनी येण्यास वेळ लागणार नाही .
त्यासाठी पुन्हा संदिप कोतकर सारखा भगिरथ पाहिजे जो पाण्याची गंगा केडगावला आणुन केडगावच्या भरभराटीचा दिवा कायम तेवत ठेवील .
संदिप दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा .
—- योगेश गुंड ( लोकमत )
केडगाव