आगडगाव येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा
७५ संघानी घेतला सहभाग
नगर ब्रेकींग न्यूज – विदयार्थीनी शालेय खेळात एका तरी खेळात सहभाग घेतला पाहीजे. खेळात प्रविण्य मिळालेले खेळाडू पीएसआय झाले. खेळाकडे लक्ष देण्याची विशेष गरज आहे. शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व दिले पाहिजे असे प्रतिपादन नगर तालुका ग्राम सुधार सेवा मंडळाचे अध्यक्ष उद्धवराव दुसुंगे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय, नगर तालुका क्रीडा समिती, नगर तालुका ग्राम सुधार सेवा मंडळाचे भैरवनाथ विद्यालय आगडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उद्घाटन प्रंसर्गा बोलत होते. आज १४व १७ वर्ष वयोगटातील मुलांचे सामने झाले जवळपास पन्नास शाळांनी सहभाग घेतला. आगड गाव देवस्थानच्या वतीने तीन दिवस विदयार्थासाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
यावेळी दिनकर थोरात, संजय कराळे, भीमराज भिंगार दिवे, उपसरपंच संदिप कराळे, पोपट कराळे, परसराम कराळे, गोरक्षनाथ कराळे
ज्येष्ट क्रिडा शिक्षक चंद्रकांत पवार, क्रिडा समिती अध्यक्ष महेंद्र हिंगे, सीताराम बोरुडे, त्रिंबक सांळुके, दिपक ठाणगे, मारुती कोतकर, किर्ती धोपावकर, भाऊसाहेब पवार, मिलींद थोरे, अमोल शिलवंत, भरत लगड, सुनील म्हस्के,, बाबा भोर, मल्हारी कांडेकर, संतोष रोहकले, सुनील कोरके रविंद्र,हंबर्डे, झुंबर खर्से सह विदयार्थी उपस्थित होत.