दहिगाव येथे कृषी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन..

 नगर ब्रेकींग न्यूज

दहिगाव येथे कृषी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन..
कृषी अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक…
रुईछत्तिशी – दहिगाव तालुका नगर येथे कृषी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.सध्या आधुनिक पद्धतीने शेती करणे काळाची गरज बनली आहे.कमी खर्चात, कमी कष्टात शेती कशी जास्त पिकवता येईल याचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कृषी खात्यावर येऊन ठेपली आहे. त्याच धर्तीवर कृषी मार्गदर्शन केले जात आहे.खरीप आणि रब्बी हंगामातील पिके कोणत्या पद्धतीने घेतली पाहिजेत,पिकांचे व्यवस्थापन व नियोजन कसे केले पाहिजे याचे संपूर्ण मार्गदर्शन कृषी अधिकारी करांडे साहेब, गांगर्डे साहेब, भोईटे साहेब यांनी शेतकऱ्यांना केले आहे.आजकाल पावसाचे प्रमाण कमी होत चालले असून दुष्काळजन्य परिस्थिती वारंवार निर्माण होते. यावर उपाय म्हणून शेततळे काळाची गरज बनले आहे.पावसाच्या पाण्यावर शेततळ्याचे नियोजन करुन उन्हाळ्यात देखील पिकांचे नियोजन केले पाहिजे.आजकाल आधुनिक शेती काळाची गरज बनली आहे असे कृषी खात्याकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.कार्यशाळा प्रसंगी माजी सरपंच सुनिल म्हस्के, गोवर्धन म्हस्के, सुनिल शिंदे, राजू हंबर्डे, गोरख म्हस्के, महेश म्हस्के, पोपट पोटरे, किशोर शिंदे, मच्छिंद्र म्हस्के व रामवाडी तरुण मंडळाचे सर्व तरुण , शेतकरी , ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *