यंदाच्या पावसाळ्यात सिना प्रथमच दुथडी ,

 यंदाच्या पावसाळ्यात सिना प्रथमच दुथडी , सिना पट्ट्यातील शेतकरी सुखावला..

देविदास गोरे.
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील सोलापूर रस्त्यालगत असणाऱ्या गावांना वरदान ठरणारा सिना नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरुन वाहिली.नगर शहर व परिसरात झालेल्या पावसाचे पाणी सिना नदीला येते. सीना नदीच्या पाण्यावर नगर , आष्टी , श्रीगोंदा , कर्जत तालुक्यातील अनेक गावे अवलंबून आहेत त्यामुळे या गावातील रब्बी हंगामातील पिकांची चिंता मिटणार आहे.अजूनही पावसाचा जोर वाढल्याने सिना नदी वाहती राहणार आहे.
“सिना नदीवरील निमगाव धरण आष्टी आणि कर्जत तालुक्याचे वरदान आहे. सिना पट्ट्यातील कापूस आणि मका पिकांवर शेतकऱ्यांची मोठी आर्थिक मदार अवलंबून असते त्यामुळे शेतकरी पावसाने सुखावला आहे.
“सिनाचे पाणी रब्बीला वरदान – सिना नदीचे पाणी रब्बी पिकांना वरदान ठरणार आहे. रब्बीचे कांदा , ज्वारी , गहू , हरभरा इत्यादी पिके जोमाने येणार आहेत. सिनाच्या पाण्याने विहिरी , कूपनलिका यांना पाणी वाढते व रब्बी पिके पाऊस कमी झाला तरी सिंचनाच्या जीवावर पेरली जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *