तांदळी वडगाव येथे आयुष्मान भव: शिबिराचे आयोजन , नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी..
रुईछत्तिशी – तांदळी वडगाव येथे केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत भव: मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.देशातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सदृढ रहावे या उद्देशाने मोदी सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. तांदळी वडगाव येथे आयुष्मान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन सरपंच छाया घिगे व उपसरपंच समाबाई मुनफन यांच्या हस्ते करण्यात आले.मोफत आरोग्य तपासणी – १७६ , आयुष्मान गोल्डन कार्ड – २ , आशा कार्ड – ६३ , गरोदर माता तपासणी – ०८ , स्तनदा माता तपासणी – ०५ , किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी – ४७ , १६ वर्ष वयातील विद्यार्थांना धनुर्वात तपासणी लस – १७ असे आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आले. डॉ.सौरभ शिंदे , डॉ.तांबोळी , डॉ.भालसिंग , आशा स्वयंसेविका लंके , वर्षा घोंगडे , रेखा आंधळे यांनी रुग्णांची तपासणी केली व औषधांचे वाटप केले , नगर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद काकडे , भूषण शिंदे , प्राथमिक वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष टाक यांनी शिबिरास भेट देऊन आढावा घेतला. आयुष्मान भारत शिबिर व मेळावा यशस्वी होण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे , वैभव मुनफन , दीपक घिगे , बाळासाहेब ठोंबरे , राजेंद्र उबाळे , रमेश ठोंबरे , संतोष घिगे , संजय पवार , दिलीप मुनफन , भरत ठोंबरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.