रुईछत्तिशी येथे शिवजयंती निमित्त शिवसप्ताहाचे आयोजन..
नामवंत किर्तनकार करणार शिवरायांचा गजर…
देविदास गोरे..
रुईछत्तिशी – रुईछत्तिशी ता.नगर येथे दरवर्षी प्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येत आहे.१६ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता सुभेदार या ऐतिहासिक चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे.ऐतिहासिक चित्रपटातून शिवरायांची शिकवण आणि आचरण याची प्रचिती येणार आहे.१७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार , वाणीभूषण ह.भ.प विशाल महाराज खोले , मुक्ताईनगर यांचे सूश्राव्य किर्तन होणार आहे.१८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता ह.भ.प सोपान महाराज सानप , आळंदी देवाची यांचे किर्तन होणार आहे.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवजयंतीच्या दिवशी ८.०० वाजता महाशिवारती , शिवकालीन मल्लखांब , मार्कंडेय विद्यालय , अहमदनगर येथील विद्यार्थ्यांचे मर्दानी खेळ व प्रात्यक्षिके सादर करणार आहेत व रात्री ८.३० वाजता विदर्भभूषण ह.भ.प सोपान महाराज कन्हेरकर , अमरावती यांचे किर्तन होणार आहे.शिवजयंती उत्सव निमित्त आयोजित केलेले हे सर्व कार्यक्रम अतिशय प्रभावी होणार असल्याने या तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ , तरुण बांधव , माता – भगिनी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मावळे परिवार , समस्थ शिवभक्त , रुईछत्तिशी ग्रामस्थ , भजनी मंडळ यांनी केले आहे..