भाजपच्या प्रचारात दिसल्याने तनपुरेंच्या प्रसाद शुगरने शेतकऱ्यांची ऊस तोड अचानक थांबवली 

भाजपच्या प्रचारात दिसल्याने तनपुरेंच्या प्रसाद शुगरने शेतकऱ्यांची ऊस तोड अचानक थांबवली

ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल, संपूर्ण मतदारसंघात तनपुरेंवर रोष

राहुरी: राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारात सहभागी झाल्याच्या रागातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशी निगडित प्रसाद शुगर या खाजगी सहकारी साखर कारखान्याने अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोड अचानक थांबवली आहे. केवळ विरोधी उमेदवाराच्या रॅलीत असल्याचे व्हिडिओत दिसल्याने खाजगी साखर कारखाना अधिकाऱ्यांनी सुरू असलेली ऊस तोड थांबवून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा उद्योग सुरू केला आहे. भाजप नेते, पदाधिकारी या प्रकारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणाऱ्यांना निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे कूठे कार्यकर्त्यांना धमकावणे, कुठे फोनवरून दमबाजी आणि आता तर सर्वसामान्य ऊस उत्पादकांची अडवणूक केली जात आहे. तनपुरेंचा सरंजामशाही चेहरा समोर येत आहे. पण येत्या निवडणुकीत जनता त्यांच्या कथित साम्राज्याला सुरूंग लावेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

राहुरी मतदारसंघात शेतकऱ्यांवर अन्याय सुरू झाल्याने जनतेतून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होत आहे. एकीकडे शेतकरी हिताची भाषण ठोकायची, विकासावर बोलायचे आणि त्याचवेळी स्वतःच्या खाजगी साखर कारखान्याचा वापर स्वार्थी राजकारणासाठी करायचा हे चुकीचे आहे. तनपुरे परिवाराचा ओंगळवाणा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर उघडा पडला आहे. आता मतदानातूनच तनपुरे परिवाराला धडा शिकविण्यासाठी मतदार सज्ज झाल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *