सारसनगर येथील रामदेबाबा मंदिरात नवरात्रौत्सवास प्रारंभ
भजन संध्या, माता की चौकी, कुंकुमार्चन, नवचंडी याग, गरबा-दांडिया, सिमोलंघन आदि कार्यक्रम
नगर – श्री रामदेव भक्त मंडल ट्रस्टच्यावतीने सारसनगर येथील श्री रामदेव बाबा मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त दि.15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी घटस्थापन करण्यात येऊ नवरात्रौत्सावास प्रारंभ करण्यात आला. रात्री 8 वा. मान्यवरांच्या हस्ते महाआरती होऊन श्री रामदेव भक्त मंडळाचा भजन संध्याच्या कार्यक्रम संपन्न झाला.
सोमवारी सकाळी 9.30 वा. सप्तशती पाठ, व रात्री 8 वा. भजनसंध्या, मंगळवारी सकाळी सप्तशती पाठ व रात्री 8 वा. भजन संध्या. बुधवारी सकाळी सप्तशती पाठ व रात्री 8 वा. विकी सहानी व सनी गुलाटी यांचा जय दुर्गे जागरण मंडळाचा ‘माता की चौकी’ कार्यक्रम होईल. गुरुवारी सकाळी सप्तशती पाठ तसेच स.10.30 वा. ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन. शुक्रवारी सकाळी सप्तशती पाठ व रात्री सौ.दिपाली सुराणा यांचा भजनसंध्याचा कार्यक्रम होईल. शनिवारी सकाळी सप्तशती पाठ व रात्री 9 वा. रॉयल बेन्जो गरबा पार्टीचा गरबा-रास दांडिया होईल. रविवारी सकाळी नवचंडी याग हवन, दुपारी पुर्णाहुती व कुमारिका पुजन, रात्री 8 वा. भजनसंध्या. सोमवारी रात्री 8 वा. कु.वैदेही बोरा यांचा संगितमय माता का जगरात कार्यक्रम होईल. नवरात्रौत्सवाची सांगता मंगळवार दि. 24 रोजी सायं. 6 ते 8 विजय दशमी सिमोल्लंघन कार्यक्रमाने होईल.
हे कार्यक्रम यशस्वीतेसाठी आचार्य पंडित देवेंद्र तिवारी व त्यांचे सहकार्य प्रयत्नशिल आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिवशीच्या कार्यक्रमांसाठी विविध परिवार व मान्यवरांचे योगदान राहणार आहे. तरी यासर्व कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री रामदेव भक्त मंडळ ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.