अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने सिताराम सारडा विद्यालयात ‘वाचन प्रेरणा’ दिन संपन्न
पुस्तके व महान व्यक्तींची प्रेरणा परिसा समान
– शिवाजीराव नाईकवाडी
नगर – आपण जीवनात किती संपत्ती मिळवली, त्यापेक्षाही किती पुस्तके वाचली यावरुन तुमचे व्यक्तीमत्व ओळखले जाते. आपल्या जीवनात पुस्तके व महान व्यक्ती यांच्या कार्यकर्तुत्वाची प्रेरणा ही परिसासमान आयुष्याचे सोने करणारी असते, असे उद्गार सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक शिवाजीराव नाईकवाडी यांनी व्यक्त केले. मा.राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘वाचन प्रेरणा’ दिनी अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने हिंद सेवा मंडळाच्या सिताराम सारडा विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, शिल्पा रसाळ, प्रा.ज्योती कुलकर्णी, शाळेचे पर्यवेक्षक किशोर खुरांगे, ग्रंथपाल अमोल इथापे, उपग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल उपस्थित होते.
प्रमुख वक्ते नाईकवाडी यांनी ‘स्लाईड शो, गप्पा-गोष्टीच्या माध्यमातून रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्व विषद केले.
प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या. संचालिका शिल्पा रसाळ यांनी जिल्हा वाचनालयाचे ऐतिहासिक परंपरा सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना वाचनालयाचे एक वर्षाचे मोफत सदस्यत्व जाहीर केले. यावेळी उपस्थितांचा शाळेच्यावतीने सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन दिपक शिरसाठ यांनी केले तर आभार क्रांती मुंदनकर यांनी मानले. उपस्थितांना ‘पुस्तक चळवळी वृद्धींगत करणारी प्रेरणादायी शपथ देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास चित्रकार अशोक डोळसे, दिपक आरडे, रविंद्र चोथे, वृषाली जोशी, कुमार गुंटला, संकेत फाटक उपस्थित होते.