पावसाचे अल्प प्रमाण , कांदा व गव्हाचे आगार धोक्यात , रब्बी हंगाम संकटात..
रुईछत्तिशी – अल्प प्रमाणात झालेला पाऊस यामुळे यंदाचा रब्बी हंगाम धोक्यात येणार आहे.मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असून देखील कांदा व गहू पिकांना पाणी टंचाई भासली होती.यंदा शेवट पाऊस झाला पण पावसाचे प्रमाण अल्प असल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.सध्या कांदा रोपे टाकण्याची लगबग चालू आहे पण पाण्याची शाश्वती नसल्याने कांदा पीक साधणार नाही. रुईछत्तिशी परिसर गव्हाचे कोठार मानले जाते.गहू देखील अल्प प्रमाणात होणार असल्याने यंदा धान्याची देखील टंचाई निर्माण होणार आहे. ज्वारी व तुरीला पाण्याची गरज जिरायती भागात असणारे रब्बी पिकांचे उत्पन्न कमी होणार आहे.नदी , नाले , बंधारे अजून पंधरा दिवसात कोरडे पडून पाणी टंचाई देखील निर्माण होणार आहे. रुईछत्तिशी परिसरात पाऊस अल्प झाल्याने रब्बी हंगाम फुलणार नसल्याने खरिपाचे एकच पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
“कांदा निम्म्याने घटणार – कांदा निम्म्याने घटणार असून शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढणार आहे.कांदा पीक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढतो.पुढील वर्षी कांदा विक्रिसाठी नसल्याने उन्हाळ्यात शेतकऱ्यांना खर्चासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे.
“विहिरी , कूपनलिका यांचा एक ते दोन महिन्यात उपसा – मक्याचे पीक निघाले का गहू आणि हरभरा पेरला जातो या पिकांना उगवून येण्यासाठी पाण्याची गरज असते.पिकांना पाणी देण्यासाठी पंप चालू केले की विहिरींचा उपसा होणार आहे त्यामुळे एक ते दोन महिन्यात या भागात उन्हाळा जाणवणार आहे.