आता मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापूरची यात्रा !
आ. नीलेश लंके यांची घोषणा
लंके म्हणाले, बोलत नाही, करून दाखवतो
नगर तालुक्यातील मोहटादेवी यात्रेतही उत्साहाला उधाण
नगर : प्रतिनिधी
हिंदू माता-भगिनींसाठी मोहटादेवी दर्शन यात्रेच्या धर्तीवर आता पारनेर-नगर मतदारसंघातील मुस्लिम माता-भगिनींसाठीही यात्रेचे आयोजन करण्याची घोषणा आ. नीलेश लंके यांनी शनिवारी नगर येथे बोलताना केली. खेड-शिवापूरच्या दर्वेश रहेमतुल्लाय दर्गाची यात्रा दसऱ्यानंतर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत या यात्रेत मतदारसंघातील ३० ते ३५ हजार मुस्लिम माता-भगिनी सहभागी होतील असा विश्वास आ. लंके यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.
आ.लंके म्हणाले, समाजामध्ये एकोपा राहिला पाहिजे. सर्वधर्मसमभावाच्या केवळ गप्पा मारण्यापेक्षा कृती महत्वाची ठरते. बोलण्यापेक्षा कर्तव्य करणे महत्वाचं असते. ज्या पध्दतीने हिंदू माता-भगिनींसाठी मोहटादेवी यात्रेचे आयोजन आले आहे त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातील महिलांसाठीही खेड शिवापूरच्या यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे लंके म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मोहटादेवी यात्रेचा गेल्या सोमवारी शुभारंभ झाल्यांनतर जिल्हा परीषदेचा सुपा गट व पारनेर शहर, निघोज गट, कान्हूरपठार गट, टाकळी ढोकेश्वर गट व ढवळपुरी गटांमधून हजारो महिलांनी मोहटादेवी यात्रेची पर्वणी साधली. यात्रा सुरू झाल्यानंतर दिवसागणीक महिलांचा उत्साह वाढत असल्याचे दिसून आले. पारनेर तालुक्यातील महिलांचे दर्शन झाल्यानंतर शनिवारी नगर तालुक्यातील महिलांची मोहटादेवी दर्शन यात्रा सुरू झाली. रविवारी नगर तालुक्यातील यात्रेने या यात्रोत्सवाचा समारोप होणार आहे.
शनिवारी सकाळी देहरे गटातील विविध गावांतून आलेल्या माता भगिनी बारा बाभळी येथील चांदबिबीच्या महालाजवळ एकत्र जमल्या. तिथे आ. नीलेश लंके यांचे पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले.यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, माझे कर्तव्य म्हणून मी या यात्रेचे दरवर्षी आयोजन करतो. माता भगिनींना वर्षभर कुठे जाण्याची संधी मिळत नाही. या यात्रेच्या निमित्ताने दर्शनाची संधी मिळते. माता-भगिनींमध्ये संवाद साधला जातो असे ते म्हणाले. या यात्रेच्या निमित्ताने महिला कुटूंबातील मतभेद, समस्या विसरून एकत्र येतात व आनंदाने व्यक्त होतात. ७०-७५ वर्षांच्या आजींचा उत्साह पाहून या यात्रेचे सार्थक झाल्यासारखे वाटते असे लंके म्हणाले.
यावेळी अजय लामखडे, सरपंच प्रियंका लामखडे, संजय गारूडकर, भाऊसाहेब काळे, गणेश साठे, भरत फलके, दिलीप सिनारे, एकनाथ झावरे, गोरक्षनाथ सोनवणे, अविनाश जाधव, घनश्याम म्हस्के, शिवाजीराव होळकर, भाऊसाहेब काळे सरपंच बाबा काळे, राजु नरवडे, संजय गेरंगे, संजय जपकर, रमेश आबा काळे, नितिन भांबळ, बालवे मेजर, नंदकुमार सोनवने , हरिदास जाधव, सुनील कोकरे, सुदाम सातपुते, आबा सातपुते, लखन डोंगरे, राजु ढेपे, बाळासाहेब पानसरे , ईश्वर जपे, गणेश कळमकर अनिल नरवडे, गौरव नरवडे, दत्ता खताळ, अमोल कांबळे , सागर जगताप, राजु रूपनर, भानुदास लाळगे , बाळासाहेब पानसंबळ, संजय चव्हाण, सागर सप्रे, विकास जगताप, गव्हाने सर, घनशाम म्हस्के, अमोल शिंदे, वसंतराव पवार, भारत पाटिल फलक़े, बापू फलके, बी.आर. कर्डिले , तात्यासाहेब कर्डिले , अनुराधा कांडेकर, तसेच विविध गावचे ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यांच्यासह पारनेर-नगर मतदारसंघातील कार्यकर्ते, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
▪️चौकट
तोच उत्साह, तोच जोश
सोमवारपासून सुरू झालेला हा यात्रोत्सव नगर तालुक्यात पोहचल्यानंतर तिथेही पारनेर तालुक्याप्रमाणेच माता-भगिनींमध्ये तोच उत्साह आणि तोच जोश दिसून आला. माता-भगिनींनी उर्स्फुर्तपणे नाचून, गाउन या यात्रेचा आनंद घेतला.
▪️चौकट
खेड शिवापूर यात्रेच्या नियोजनासाठी बैठक
मोहटादेवी यात्रेनंतर मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापूर येथील दर्गाहच्या यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून या यात्रेचे नियोजन करण्यासाठी बुधवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आ. नीलेश लंके यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन बाबाजी तरटे, सुदाम पवार, अर्जुन भालेकर, कारभारी पोटघन, बाळासाहेब खिलारी यांनी केले आहे.
▪️चौकट
कवडयांच्या माळा, परडी आणि जोगवा
नगर तालुक्यातून उर्स्फुतपणे सहभागी झालेल्या महिलांमध्ये गळयात कवडयांच्या माळा घातलेल्या महिलांचाही समावेश होता. हाती देवीची परडी घेउन जोगवा मागत, देवीची गाणी म्हणत त्यांनी मोहटादेवीकडे प्रस्थान केले.
▪️चौकट
१ लाख १६ हजार महिलांचे दर्शन
सातव्या माळेअखेर मतदारसंघातील १ लाख १६ हजार माता-भगिनींनी मोहटादेवी दर्शनाचा लाभ घेतल्याचे आ. लंके यांनी यावेळी सांगितले. रविवारी नगर तालुक्यातील उर्वरीत गावांमधील महिलांसाठी यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.
▪️फोटो ओळ
१ कवडयाच्या माळा, देवीची पगडी घेऊन नगर तालुक्यातील महिला मोहटादेवी यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
२ नगर तालुक्यातही मोहटादेवी यात्रेमध्ये महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.