घराघरात संस्कार निर्माण करणे हीच खरी घटस्थापना – ह.भ.प प्रांजल दीदी जाधव..*
*जानई माता सातव्या माळेचे गुंफले पुष्प..*
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – रुईछत्तिशी येथे जानई माता नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.घराघरात संस्कार निर्माण करणे हीच खरी घटस्थापना आहे असे प्रतिपादन हभप प्रांजल दीदी आपण यांनी केले.सातव्या माळेचे पुष्प त्यांनी गुंफले , आवडे देवाशी तो ऐका प्रकार ! नामाचा उच्चार रात्रंदिवस या संत एकनाथ महाराज यांच्या अभंगाचे त्यांनी निरुपण केले.थोर क्रांतिकारक यांची प्रेरणा घेऊन आजकाल संस्कार देणे आणि ते टिकवून ठेवणे हीच घटस्थापना आहे .या त्यांच्या वाणीतून संस्कारशिल राष्ट्र उदयास येणे गरजेचे आहे याचीच प्रचिती येते.उत्सवात दररोज विविध स्पर्धा घेऊन त्यातून पहिले तीन क्रमांक काढून महिलांना पैठणीचे वाटप करण्यात आले.लिंबू चमचा , संगीत खुर्ची , तळ्यात मळ्यात , उखाणे स्पर्धा , जात्यावरील गाणी , रांगोळी स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले. लकी ड्रॉ मार्फत नऊ चिठ्ठ्या काढून नऊ दुर्गांना नऊ पैठणी देण्यात आल्या.दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.गावातून मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असल्याने कार्यक्रम भव्य – दिव्य असा रंगतदार होत आहे.पुढील वर्षी अजून मोठे नियोजन असल्याने पंचक्रोशीतील या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे. जानई माता उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी सुंदर नियोजन करून रंगत आणली आहे.सर्व माता – भगिनी यांना व सर्व कार्यक्रमात मिळालेला मान – सन्मान यामुळे आनंद व्यक्त केला आहे.