शालेय जीवनात शिस्त, अभ्यास व व्यायाम ही सफल जीवनाची त्रिसूत्री -बाळासाहेब हराळ
नगर – शालेय शिस्त, अभ्यास व शारीरिक व्यायाम हे तीन सूत्र जर अंगीकारले तर जीवनात यश हमखास मिळेल. विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात स्वतःला झोकून देऊन स्वतःला सिद्ध करावे, व मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन माजी जिल्हा परीषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना केले.
अहमदनगर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या वाढदिवसाचे निमित्त गुंडेगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
गुंडेगाव येथील उद्योजक निलेश रामकृष्ण चौधरी यांनी आपल्या स्वखर्चातून हराळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव येथील सर्व शालेय विद्यार्थ्यांना आपल्या स्वखर्चातून 400 वह्यांचे व पेनांचे मोफत वाटप केले. त्यानिमित्त विद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापक परशुराम साबळे यांमी निलेश रामकृष्ण चौधरी, बाळासाहेब हराळ यांचा सन्मान केला.
सदर कार्यक्रमासाठी सेवा संस्थेचे संचालक शंकर तात्या हराळ, एकनाथ केरू कासार , दत्तात्रेय हराळ सर, ज्ञानदेव कोतकर, सर्जेराव माने, राजेंद्र मोहिते, सुनील भापकर ,गणेश पंदरकर, महादेव जरे आदी उपस्थित होते. निलेश रामकृष्ण चौधरी यांनी केले. एकनाथ कासार यांनी चौधरी यांचे आभार मानले.