युवकांच्या रोजगारासाठी सातत्याने प्रयत्नशील: खा. डॉ. सुजय विखे पाटील

 युवकांच्या रोजगारासाठी सातत्याने प्रयत्नशील: खा. डॉ. सुजय विखे पाटील

पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार  मेळाव्याचे उद्घाटन खासदार विखेंच्या उपस्थित संपन्न 
अहमदनगर –
युवकांच्या रोजगारासाठी सातत्याने विखे पाटील परिवार प्रयत्न करत असतो. याच अनुषंगाने हा मेळावा देखील महत्वाचा असून जास्तीत जास्त युवकांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आजच्या या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना अधिकाधिक रोजगार मिळावा असे मत खासदार सुजय विखे पाटील यांनी मांडले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात दोन हजार पेक्षा अधिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार असून सुमारे २५ पेक्षा जास्त कंपन्यांच्या माध्यमातून हा रोजगार मिळणार आहे. 
आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोरगरिबांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे पारनेर तालुक्यात पोहोचवण्याचे काम भाजपा कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी चोखपणे केले असून या मेळाव्याचे आयोजन करून ही शृंखला ते पुढे नेत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. असे देखील मत खासदार सुजय विखेंनी मांडले.
खासदार विखे पुढे म्हणाले की, आज मोठ्या उमेदीने असंख्य युवक रोजगार मेळाव्यास आले आहेत. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवक युवतींची निवड होणार आहे. परंतु ज्यांची निवड होणार नाही अशांच्या उणीवा जाणून त्यांना योग्य ते मार्गदर्शन विखे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात येईल. तसेच या युवकांनी न डगमगता जोमाने कष्ट करून प्रामाणिक काम करावे असा सल्ला देखील त्यांनी बोलताना युवकांना दिला.
याप्रसंगी जि. प. सदस्य काशिनाथ दाते सर, भाजपा कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, नगरसेवक युवराज पठारे, सुभाष दुधाडे, गणेश शेळके, सुनील थोरात, दत्ता नाना पवार, सचिन वराळ, ऋषिकेश गंधाटे, निलेश बाबर, तुषार पवार, विकास रोहकले, किरण कोकाटे, अमोल मैड, सागर मैड यांच्यासह युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *