सडे गावात तनपुरे गटाला खिंडार -युवकांचा कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

सडे गावात तनपुरे गटाला खिंडार; युवकांचा कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

राहुरी (प्रतिनिधी) –  राहुरी तालुक्यातील सडे गावातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी माजी मंत्री, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सत्यजित कदम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने आ.प्राजक्त तनपुरे यांच्या गटाला खिंडार पडले आहे.

       शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, गेल्या महीन्यापासून भाजपा मध्ये मोठ्या प्रमाणात युवक वर्ग प्रवेश करत आहे, युवकांनी ही निवडणुक हातात घेतली आहे. यावेळी माजी जि.प. सदस्य विक्रम तांबे, धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाचकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. ग्रा.पं.सदस्य अनिल बर्डे, ग्रा.पं.सदस्य सागर ननवरे, युवा नेते प्रफुल पानसंबळ, शंकर बर्डे, सचिन शिंदे, रामा मंचरे, आदित्य बर्डे, प्रतीक गावटे, कुणाल दातीर, आकाश भुसारे, राहुल नेटके, विशाल दहिफळे, यश पानसंबळ, सुमित पानसंबळ, श्रीकांत पानसंबळ, विशाल घोरपडे, ऋषिकेश घोरपडे, संजय घोरपडे, करण शिंदे, प्रवीण पटेकर, नवनाथ माळी, चांगदेव भोसले, भरत चौधरी, राधाकृष्ण भाटे, कौस्तुभ सरोदे, अजय साळवे, अजय माळी, संदीप बर्डे, करण माळी, आदित्य कसबे आदी अनेक युवकांनी प्रवेश केला महायुतीमध्ये भाजपवर विश्वास दाखवत कर्डिले यांना सडे गावातून अधीकाधिक मताधिक्य मिळवून देण्याची हमी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *