मठपिंप्री , हातवळण व मराठवाड्यातील लोकांची गैरसोय , नगर – सोलापूर मार्गावरील सर्व्हिस रोडला स्थगिती…*

*मठपिंप्री , हातवळण व मराठवाड्यातील लोकांची गैरसोय , नगर – सोलापूर मार्गावरील सर्व्हिस रोडला स्थगिती…*
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – नगर – सोलापूर मार्गाचे काम प्रगती पथावर असताना सर्व्हिस रोड बाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे.मार्गावर जवळपास सर्वच पुलांच्या ठिकाणी सर्व्हिस रोड देण्यात आले आहेत मात्र मठपिंप्री , हातवळण , मराठवाड्यातील अनेक गावांना जाण्यासाठी सर्व्हिस रोड तांत्रिक अडचणींमुळे स्थगित केला आहे यामुळे स्थानिक लोकांची खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे.नगर वरून येताना मराठवाडा तसेच शेजारील अनेक गावांना मार्गावरून खाली उतरण्यास रस्ता नसल्याने लोकांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.प्रस्तावित रस्ता असताना देखील हा सर्व्हिस रोड कोणत्या कारणाने स्थगित करण्यात आला आहे याचे कारण समजू शकले नाही.दहा ते बारा गावांची गैरसोय झाली असून याबाबत महामार्ग प्राधिकरण कोणतीही कार्यवाही करण्यास तयार नाही.सर्व गावातील ग्रामपंचायतींनी पत्र दिले असून अद्याप देखील काम सुरू करण्यात आले नाही.
               रुईछत्तिशी गावावर शेजारील गावे अवलंबून असल्याने या लोकांची दैनंदिन उदरनिर्वाहाची देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे.अहमदनगर दक्षिणेचे खासदार डॉ सुजय विखे पाटील व नगर – श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थ वर्गातून होऊ लागली आहे.बायपास सुरू होण्यापूर्वी या सर्व्हिस रोडचे काम सुरु करण्यात आले नाही तर मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. महामार्गावर जेथे मोठे पुल बांधण्यात आले आहेत तेथे सर्व्हिस रस्ता देण्यात आला आहे त्यामुळे हा सर्व्हिस रस्ता देखील लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे.गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता येथूनच असल्याने नगरला कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांची तसेच शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची , ग्रामस्थांची मोठी गैरसोय यामुळे निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *