सुपा एमआयडीसीतुन पळून गेलेल्या कंपन्या आणणार.
पाच ते सहा हजार तरुणांना रोजगार मिळणार
अहमदनगर – विळद घाट ( ता. नगर ) येथे पाचशे एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात आहे त्याचे मूल्यांकन मंत्रालयास्तरावर आहे. जवळपास पाच ते सहा हजार युवकांना रोजगार निर्मिती या माध्यमातून होणार आहे. औद्योगिक कंपन्या आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. सुपा एमआयडीसी मधील कंपन्या पळून गेल्या,सोडून गेल्या त्यांना नगर जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. कंपन्या गेल्याने युवकांचे नुकसान होऊ देणार नाही असे यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
वडगाव गुप्ता ( ता. नगर ) येथे दक्षिण मतदार संघातील शेत नागरिकांना साखर व डाळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोठे उपसभापती राभाजी सूळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, मंजाबापू घोरपडे ,मधुकर मगर, भाऊसाहेब ठोंबे,, संजय गिरवले, राजेंद्र गावखरे, पोपटराव घुंगर्डे, प्रतिक शेळके, दिपक कार्ले, सरपंच सोनूताई शेवाळे, उपसरपंच विजय शेवाळे, बाबासाहेब डोंगरे, राजेंद्र शेवाळे , प्रा.शिवाजी घाडगे यावेळी उपस्थित होते. यावेळी विखे म्हणाले 22 जानेवारीला एक आगळीवेगळी दिवाळी आपण साजरी करणार आहोत .ज्या गावांमध्ये राम मंदिर व हनुमान मंदिर आहे त्या गावात 22 जानेवारी ला श्रीरामचंद्र प्रभूं साठी लाडूच्या प्रसादाचा नैवेद्य दाखवणार हि संकल्पना अहमदनगर जिल्हा दक्षिण मतदार संघात सुरू केली आहे. व सर्व आमदारांना विश्वासात घेऊन हा उपक्रम चालू केला आहे. नगर जिल्ह्याचे नाव मागे राहू नये व आमचे नाव पुढे राहावे हा उपक्रम आम्ही घेत आहोत. ही संकल्पना पंतप्रधानांपुढे लवकरच पोहोचली जाणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे चे काम केंद्र सरकारने मागील काळात केले होते. त्याच पद्धतीने यावेळी निर्यात बंदी उठवण्यासाठी किंबहुना नाफेडच्या माध्यमातून अनुदान देणे असा सकारात्मक निर्णय सोमवार ते मंगळवार पर्यंत होणार आहे. यावेळी दीड हजार लोकांना साखर वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.