मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

 

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

अहमदनगर-दुधाला हमीभाव मिळावा, कांद्याचे निर्यात बंदी व इथेनॉल निर्मिती त्वरित उठवावी,अग्रीम विमा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळावा, गारपीटग्रस्त अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळावे व दुष्काळग्रस्त उपाययोजना सर्व मंडळांना लागू कराव्यात. मागील अतिवृष्टीचे थकित अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे. ऑनलाईन पीक पाहणी  रद्द करावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक १२ रोजी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. तरी नगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *