गारपीट ग्रस्त शेतकऱ्याना भरपाई देण्यात यावी
अहमदनगर -अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग चार-पाच दिवस अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी याबाबतचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.
अहमदनगर जिल्ल्यामध्ये मागील आठवड्यामध्ये सलग चार-पाच दिवस मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे नगर जिल्ल्यामधील नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव व पाथर्डी तसेच संगमनेर अकोले तसेच उर्वरित तालुक्यांमध्ये मोठ्या अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .विशेषतः ज्वारी, गहू, हरभरा तूर व मका या पिकांचे तसेच नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या घराचे, गोठ्यांचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये नगर, पारनेर श्रीगोंदा व कर्जत या तालुक्यांमध्ये सर्वाधिक अवकाळी पाऊस व गारपीट झालेली आहे. जिल्ह्याल अनेक शेतकन्यांनी फळबागाची पण लागवड केली आहे. ल्यामध्ये डाळिंब संत्री, मोसंबी, केळी, आंबा व चिकू या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रशासन संबंधित तालुक्यांचे तहसलिदार, कृषी अधिकारी व तलाठी याचे मार्फत गावावगांत जावुन अवकाळी व गारपीठ झालेल्या भागाची ताबडतोब पाहणी करून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. ताबडतोब शेतकन्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा.
शाशिकांत गाडे, जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके,, उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले, रामदास भोसले, माजी जिल्हा परीषद सदस्य, बाळासाहेब हराळ, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे,कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, प्रकाश कुलट, अॅड सयाराम बानकर उपस्थित होते.