वाळकी गटातील गावात उद्या विविध विकास कामांचे भूमिपूजन..
देविदास गोरे.
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील वाळकी गटात असणाऱ्या वाळकी , देऊळगाव सिद्धी , हिवरे झरे , घोसपुरी , सारोळा कासार तसेच दरेवाडी गटातील अरणगाव गावात खासदार डॉ.सुजय विखे , आमदार बबनराव पाचपुते व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन सकाळी ८.०० वाजता करण्यात येणार आहे.दोन महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागणार असल्याने नगर दक्षिणेतील सर्वच विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यासाठी खासदार विखे व आमदार बबनराव पाचपुते यांनी आघाडी घेतली आहे. आमदार बबनराव पाचपुते यांनी नगर – श्रीगोंदा मतदारसंघात अनेक कामासाठी मोठा निधी मिळवून दिला आहे तसेच त्यांना सहकार्य म्हणून केंद्रातून अनेक कामे मंजूर करुन आणली आहेत.वाळकी , सारोळा कासार , घोसपुरी , देऊळगाव सिध्दी येथे भाजपची सत्ता असल्याने अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.आगामी काळात देखील राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढू असे आमदार बबनराव पाचपुते व खासदार डॉ.सुजय विखे यांनी स्पष्ट केले आहे.