गुंडेगावच्या उपसरपंच पदी कुसुम हराळ…*

 गुंडेगावच्या उपसरपंच पदी कुसुम हराळ…*
*माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाला धक्का देत कुसुम हराळ यांचा बाळासाहेब हराळ गटात प्रवेश…*

देविदास गोरे..

रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गुंडेगावच्या उपसरपंच पदी कुसुम हराळ यांची निवड करण्यात आली आहे.मागील ग्रामपंचायत निवडणुकीत कुसुम हराळ यांनी भाजप प्रणित बबन पाटील हराळ यांच्या गटाकडून ग्रामपंचायत सदस्य पद मिळवले.सरपंच पद आरक्षित असल्याने भाजपच्या  मंगल सकट सरपंच पदी विराजमान झाल्या.१३ सदस्य असणाऱ्या या ग्रामपंचायत मध्ये हराळ गटाचे ०६ तर कर्डिले गटाचे ०६ असे १२ सदस्य व संतोष भापकर यांच्या रूपाने अन्य ०१ असे सदस्य निवडून आले त्यामुळे गुंडेगाव ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली.आज झालेल्या उपसरपंच निवडीत भाजपच्या कुसुम हराळ माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या गटात जाऊन उपसरपंच झाल्याने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले गटाला धक्का बसला आहे.भाजप कडून संतोष धावडे यांनी अर्ज दाखल केला होता परंतु संख्याबळ नसल्याने त्यांनी अर्ज माघारी घेतला व हराळ गटात प्रवेश केलेल्या कुसुम हराळ उपसरपंचपदी बिनविरोध झाल्या. गुंडेगाव गावातील दोन्ही सहकारी सोसायटी बाळासाहेब हराळ यांच्या गटाच्या ताब्यात आहेत.गावातील राजकीय क्षेत्र बाळासाहेब हराळ यांनी पूर्णपणे ढवळून काढले आहे.
            गुंडेगाव गावात आता सरपंच भाजपचा तर उपसरपंच महाविकास आघाडीचा अशी स्थिती निर्माण झाली आहे.गावागावात पक्ष बाजूला ठेऊन गटातटाचे राजकरण असते.कधी एकाच पक्षातील कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. गुंडेगाव गावात बाळासाहेब हराळ यांनी एक वेगळीच लॉबिंग केल्याने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे.ग्रामपंचायत सदस्य सुरेखा चौधरी , छायाताई माने , जयश्री कुताळ , संदीप जाधव , संजय कोतकर , सुनिल भापकर , ग्रामस्थ रामदास हराळ , एकनाथ कासार , अनिल पवार , शिवनाथ कोतकर , चंद्रकांत निकम , सुभाष कोतकर , धन्यकुमार हराळ , अशोक कोतकर , संदीप भापकर , भाऊसाहेब कोतकर , अंबादास कासार , सचिन कुताळ , गोपाल बैरागी , अशोक पवार , रामदास भापकर , भाऊसाहेब शिंदे , राहुल कोतकर , अनिल हराळ आदी उपस्थित होते.शेवटी प्रोसेडिंग मीटिंग वेळी भाजपचे ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित राहिले.बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू.भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी गावात विकास न केल्याने हा निर्णय घेतल्याचे उपसरपंच कुसुम हराळ यांनी सांगितले… 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *