आत्मा योजनेतंर्गत केंद्रीय औषधी व सुगंधी द्रव्ये प्रशिक्षणासाठी रमेश भांबरे व नवनाथ जगदाळे यांची निवड…*
*लखनौ येथे प्रशिक्षणासाठी रवाना…*
रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथील माजी सरपंच व विद्यमान चेअरमन रमेश भांबरे व आदर्श डाळिंब कृषी उद्योजक नवनाथ जगदाळे यांची केंद्रीय आत्मा योजनेतंर्गत केंद्रीय स्तरावरील औषधी व सुगंधी वनस्पती या विषयावरील प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.औषधी व सुगंधी वनस्पती यापासून विविध द्रव्ये मानवी आरोग्यासाठी तयार करण्याचा मानस केंद्र सरकारने आखला आहे.रमेश भांबरे यांचे मामाचा मळा कृषी पर्यटन केंद्र औषधी वनस्पतींचे भांडार आहे तर नवनाथ जगदाळे गेल्या दहा वर्षापासून नगर तालुक्यातील एक आदर्श डाळिंब कृषी उद्योजक म्हणून कार्य करत आहेत. मामाचा मळा कृषी पर्यटन केंद्रास यामागे अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.केंद्रीय स्तरावरील या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील विविध आदर्श शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.विविध राज्यातून बॅचनुसार व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.०८ जानेवारी पासून उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथे प्रशिक्षणास सुरुवात होत आहे.रमेश भांबरे व नवनाथ जगदाळे यांच्या निवडीने नगर तालुक्यातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.गावचे सरपंच विलास लोखंडे , उपसरपंच प्रशांत वाळके , व्हा. चेअरमन सुनिल जगदाळे , माजी व्हा. चेअरमन भरत भुजबळ , पत्रकार देविदास गोरे यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहे