बुऱ्हाणनगर जलवहिनी फुटल्यामुळे चौदा गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत
अहमदनगर – रेल्वेच्या कामामुळे बुऱ्हाणनगर जलवाहिनी फुटल्यामुळे १४ गावाचा पाणीपुरवठा आठ दिवसापासून बंद .नागरिकाना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ. रेल्वेचे काम लवकर पुर्ण करा पाणी पुरवठा सुरळीत चालू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परीषद संदेश कार्ले, पंचायत समिती माजी उपसभापती डॉ दिलीप पवार यांनी दिला.
नगर मनमाड रेल्वे महामार्गावर रेल्वेचे काम चालू आहे. हे काम करत असताना बुऱ्हाणनगर जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे हिंगणगाव, हमीदपूर, टाकळी, खातगाव जखणगाव सह १४ गावांचा पाणी पुरवठा बंद झाला. पाणी पुरवठा बंद झाल्याच्या स्वरूपाच्या तक्रारी गावातील लोकांनी प्रशासनाकडे केल्या. परंतु प्रशासनाने त्यावर काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे लोकांनी महिलांनी संदेश कार्ले यांना माहिती दिली. कार्ले यांनी तत्काळ विळद येथील रेल्वेच्या पुलाच्या कामावर जाऊन सदर ठिकाणी संदेश कार्ले,डॉ दिलीप पवार,नितीन भांबळ,दत्ता खताळ यांनी भर पावसात कामावर जाऊन पाहणी करून रेल्वे काँट्रॅक्टरला काम लवकर करण्याच्या सूचना दिल्या. येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो काँक्रिट काम वर आल्यावर पाईप टाकता येणार आहे. आजच्या पावसाने बाजूची माती खाली ढासळत असल्याने अडचण येत आहे तरी त्या नंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. प्रशासक मात्र इतर सर्व योजना राबवते व प्रशासक काम पाहतात मात्र लोकहीताच काम पाहायला मात्र वेळ नाही अशी परिस्थिती आहे. शेवटी शिवसेना नेते संदेश कार्ले व उपसभापती डॉ पवार यांनी यात लक्ष घातल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.