निंबळक येथे घनकचरा प्रकल्प साठी ६२ लाखाचा निधी मंजुर-लामखडे
अहमदनगर -निंबळक ( ता. नगर ) ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन योजनेतून ६२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. गावामधील ड्रेनेज लाईन मधून येणारे पाण्याचे शुध्दीकरण करुन ते वृक्षारोपन व शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. घनकचऱ्यासाठी मोठा प्रकल्प उभा राहणारा असल्याची माहिती सरपंच प्रिंयका लामखडे यांनी दिली.
निंबळक( ता. नगर ) जवळ एमआयडीसी आहे. या एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या कामगार वर्ग मोठया प्रमाणात या भागात राहत आहे. गावची लोकसंख्या ही मोठया प्रमाणात वाढत आहे. सांडपाणी पाण्याचा प्रश्न ही मोठया प्रमाणात आहे. घनकचरा व्यवस्थापनेच्या माध्यमातून दलित वस्ती तसेच जय भवानी चौक ते साईनगर मंदिर परीसरात तसेच गावातील ड्रेनेज लाईन मार्फत येणाऱ्या पाण्याचे शुध्दीकरण करण्यात येणार आहे.ते पाणी शेतीला देण्यात येणार आहे. वाढत असलेली वसाहत हे धोरण डोळयासमोर ठेवत पाण्याचा योग्य वापर विचारत घेत हा प्रकल्प उभारत असल्याचे सरपंच प्रिंयका लामखडे यांनी सांगीतले. तसेच गोडसे घोलप वस्ती परीसरात सांडपाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पाचा शुभारंभ गावाचे सरपंच प्रियांका लामखडे व देश स्तरावरती जिल्हा परिषद शाळेत वीर गाथा परिक्षा उत्तीर्ण झालेली गौरी उगले याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला .यावेळी अजय लामखडे, सेवा संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश आळंदीकर,
बाबासाहेब पगारे,अर्जुन दिवटे,अशोक शिंदे अशोक कळसे गोरख शिंदे, मेहबूब शेख उपस्थित होते.