निंबळक येथे माजी उपसभापती यांच्या प्रयत्नातून बारा हजार लिटर पाण्याचा जलकुंभ
अहमदनगर – नगर तालुका पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगातील बारा हजार लीटर क्षमतेच्या तीन लक्ष रुपये खर्च करुन बांधन्यात आलेल्या जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. निंबळक येथील श्री महादेव मंदिर हे प्राचीन मंदिर असुन येथे कायम धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्याठिकानी पाण्याची सोय नसल्याने माजी उपसभापती डॉ.दिलीप पवार यांच्या स्थानिक विकास निधितील बंधित निधितुन जलकुंभ बांधन्यात आला. यावेळी सर्व भाविक ग्रामस्थांनि ह्याबद्दल समाधान व्यक्त केले .याप्रसंगी विमल पवार, अलका धामी, शंकर पवार, गेनू कोतकर, संजय कळसे, लक्ष्मण होळकर, प्रभाकर पाड़ळे, नाना कोतकर ,अशोक कोतकर, दत्ता कोतकर, बाळासाहेब कोतकर, नाथा कोतकर आदि उपस्थित होते.