जनता विद्यालयात प्रजासत्ताक अमृत महोत्सव उत्साहात साजरा , विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…
देविदास गोरे..
रुईछत्तिशी – रुईछत्तिशी येथील जनता विद्यालयात प्रजासत्ताक अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.पूर्व प्राथमिक वर्गापासून तर बारावी पर्यंत वर्गातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांत आपला सहभाग घेतला होता.गावातील ग्रामपंचायत , प्राथमिक शाळा व नंतर जनता विद्यालयातील ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच विलास लोखंडे होते.संपूर्ण देशात आज प्रजासत्ताक अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे त्या धर्तीवर जनता विद्यालयात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. टिपरी नृत्य , दांडिया नृत्य , देशभक्तीपर गीते , मनोरंजक गाणी पार पडली.विद्यालयातील वातावरण पूर्णपणे आनंदिमय होऊन गेले होते. जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
चेअरमन रमेश भांबरे यांच्या वतीने विद्यालयास भोजन देण्यात आले.गेली २० वर्षापासून विद्यालयास भांबरे यांच्यावतीने भोजन देण्यात येते.कार्यक्रमास गावातील सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , चेअरमन , व्हा. चेअरमन , संचालक , ग्रामस्थ , शिक्षक , अंगणवाडी सेविका , आशा सेविका , तलाठी , ग्रामसेवक , माता – भगिनी , पालक , लहान बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दादा महारनवर व आभार विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी धामणे यांनी मानले..