नेप्ती विविध सहकारी सोसायटी बिनविरोध
सोसायटीवर माजी आमदार शिवाजी कर्डीले व माजी सभापती भानुदास कोतकर गटाकडे
अहमदनगर-नगर तालुक्यातील राजकीय दुष्टया महत्वाच्या असणाऱ्या नेप्ती येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक माजी सरपंच विठ्ठल जपकर, उपसरपंच संजय आसाराम जपकर, माजी पंचायत समिती सदस्य किसन होले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, बाबासाहेब होळकर,मार्केट कमिटी माजी संचालक वसंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली. या सोसायटीवर माजी आमदार शिवाजी कर्डीले व माजी सभापती भानुदास कोतकर गटानी वर्चस्व मिळवले.
उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर माघारीपर्यंत जय बिरोबा ग्राम विकास पॅनलने निवडणूक प्रक्रिया हातळली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जय बिरोबा ग्राम विकास पॅनल चे दोन उमेदवार बिनविरोध झाले. उमेदवार अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भरलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन जय बिरोबा ग्राम विकास पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध केले. या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार कर्जदार प्रतिनिधी – मच्छिंद्र होळकर, दशरथ जपकर, राजेंद्र जपकर, विलास जपकर, राजाराम जपकर, अशोक जपकर, उमर सय्यद, सुरेंद्र होळकर अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी – सुरेश कदम महिला राखीव प्रतिनिधी – मुक्ता कांडेकर, रोहिणी होळकर, इतर मागास वर्ग प्रतिनिधी – जालिंदर शिंदे ,विभक्त जाती भटक्या जमाती – सादिक पवार. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची गावात मिरवणुक काढण्यात आली.
प्रसंगी सरपंच संजय जपकर, प्रा.एकनाथ होले, फारुख सय्यद, दादू चौगुले, संभाजी गडाख, एकनाथ जपकर बंडू जपकर, दिलीप होळकर, रामराव कांडेकर, जावेद सय्यद, भाऊ होळकर, रघुनाथ होळकर, रामदास फुले, बबन कांडेकर,हरि पुंड, बबन फुले, भानुदास फुले, पोलीस पाटील अरुण होले, महिंद्रा चौगुले, भास्कर जपकर, सोमनाथ जपकर, अतुल जपकर, ज्ञानदेव जपकर,, बंडु कांडेकर, नाथा जपकर, प्रकाश जपकर, शिवाजी गाडेकर, नवनाथ चौरे, नाना बेलेकर, बाळासाहेब बेल्हेकर उपस्थित होते. सर्व विजय उमेदवारांची जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डिले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी अभिनंदन केले.